Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

गणेश विसर्जन मिरवणुकीत अग्निशमन दलाने बजावली उत्कृष्ट सेवा

गणेश विसर्जन मिरवणुकीत अग्निशमन दलाने बजावली उत्कृष्ट सेवा

गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यात अग्निशमन दलाचा मोलाचा वाटा

marathinews24.com

पुणे – गणेशोत्सवामध्ये दरवर्षी प्रमाणे इतर यंञणेसमवेत अग्निशमन दल १० दिवस कार्यरत होता. विसर्जनावेळी नदीपात्रात व घाटांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये याबाबत सतर्क राहून आपले कर्तव्य बजावले. अग्निशमन दलाकडून पहिल्या दिवसापासून विसर्जन संपेपर्यंत दलाकडून एकुण १२ विसर्जन घाटांवर पालिकेतर्फे नेमण्यात आले होते. १२० जीवरक्षक तसेच अग्निशमन दलाचे ३० अग्निशमन अधिकारी व ३० जवान बंदोबस्तावर तैनात होते.

गणेशोत्सवात निर्माल्य टू निसर्ग उपक्रम, ११४ टन निर्मल्याचे संकलन – सविस्तर बातमी 

विसर्जनाच्या दोन दिवस मिरवणुक मार्गानजीक अलका चौक, अभिनव चौक व फरासखाना चौक येथे अग्निशमन वाहने दाखल करण्यात आली होती. दिड दिवस, पाच दिवस, सात दिवस व दहाव्या दिवशी विसर्जनावेळी कोठे ही कोणी बुडाल्याची घटना तर अलका चौकात एक किरकोळ आगीची घटना वगळता आगीच्या घटनेची नोंद नाही. या १० दिवसाच्या कालावधीत अग्निशमन दलाच्या सर्व अधिकारी व जवान यांच्या सर्व प्रकारच्या रजा व सुट्ट्या बंद ठेवण्यात आल्या होत्या.

अग्निशमन दलाकडून विविध घाटांवर अधिकारी व जवान यांनी उत्तम कार्य केल्याने गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडला. अग्निशमन दल नेहमीच सतर्क राहात कर्तव्य बजावत असते. – देवेंद्र प्रभाकर पोटफोडे (मुख्य अग्निशमन अधिकारी अग्निशमन दल, पुणे)

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×