Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

दिग्दर्शक रोहित शेट्टींच्या घरावर गोळीबार; पुण्यातून ५ हल्लेखोरांना अटक

वारजे माळवाडी पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहूतील घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात वारजे पोलिसांनी ५ हल्लेखोरांना अटक केली आहे. वारजे, कर्वेनगर, धायरी, नर्‍हे परिसरातून संबंधितांना ताब्यात घेत मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. सिद्धार्थ दीपक येनपुरे, समर्थ शिवशंकर पोमाजी, स्वप्नील बंडू सकट, आदित्य ज्ञानेश्वर गायके, अमन आनंद मराठे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

बनावट नोटांचे केज कनेक्शन उघड – सविस्तर बातमी

मुंबईतील जुहू परिसरात राहणारे प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर हल्लेखोरांनी पिस्तूलातून गोळीबार केला होता. ही घटना शनिवारी (दि. ३१) रात्रीच्या सुमारास घडली होती. सुदैवाने हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, घटनेनंतर बॉलिवूडसह संपूर्ण फिल्मी क्षेत्रात खळबळ उडाली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तत्काळ तपासाला गती देत सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्यास प्राधान्य दिले होते. चौकशीत संबंधित हल्लेखोर पुण्यातील वारजे, कर्वेनगर, धायरीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मुंबई गुन्हे शाखेने पुणे पोलिसांना माहिती कळवली.

पुणे पोलिसांनी शोधमोहिम राबवून ५ आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केले. हल्लेखोर हे कुख्यात गँगशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती असून, गोळीबारामागे नेमका कोणाचा हात आहे, हे तपासाअंती स्पष्ट होणार आहे. दरम्यान, मुंबई गुन्हे शाखेकडून आरोपींची सखोल चौकशी केली जात आहे. शेट्टी यांच्या घरावर हल्ला करण्यामागे कोणाचा आदेश होता, आर्थिक व्यवहार झाले का, आणखी कोणी सहभागी आहे का, याचा शोध घेतला जात आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर रोहित शेट्टी यांच्या सुरक्षेत मुंबई पोलिसांनी वाढ केली आहे.

दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणातील ५ आरोपींना वारजे पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर संबंधिताना मुंबई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

– संभाजी कदम, पोलीस उपायुक्त, परिमंडळ तीन, पुणे शहर

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×