Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

पहिले आरोग्य साहित्य संमेलन १९ ऑक्टोबरला

पहिले आरोग्य साहित्य संमेलन १९ ऑक्टोबरला

डॉ. कोल्हे दांपत्याला ‘महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्कार २०२५’

marathinews24.com

पुणे – रुग्ण हक्क परिषद, मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष, मंत्रालय, मुंबई आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे आरोग्य महोत्सव आणि पहिल्या आरोग्य साहित्य संमेलनाचे १९ ऑक्टोबर २०२५ रोजी बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे आयोजन केले आहे. या संमेलनाचे उद्घाटन सकाळी ९ वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती स्वागताध्यक्ष उमेश चव्हाण यांनी दिली.

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात संपन्न – सविस्तर बातमी 

उमेश चव्हाण म्हणाले, “या संमेलनाचे अध्यक्षपद वैद्यकीय क्षेत्रातील प्रसिद्ध लेखक व साहित्यिक डॉ. संजय ओक यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. तसेच, यंदाचा प्रतिष्ठित ‘महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्कार २०२५’ मेळघाट (जि. अमरावती) येथील पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे आणि डॉ. रवींद्र कोल्हे यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रोख आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या संमेलनात डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. प्रमोद जोग, डॉ. प्रदीप आवटे, पुणे मनपा आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे, आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार यामध्ये सहभागी होणार आहेत.”

दिवसभर संमेलनामध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत. आरोग्य साहित्य आढावा, चर्चासत्रे, परिसंवाद, कवी संमेलन, संगीत रजनी, व्याख्याने, पुस्तक प्रकाशन आणि स्मरणिका प्रकाशन यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री फिरता दवाखाना योजनेचे उद्घाटन होणार आहे. कलाकार, साहित्यिक, पत्रकार यांच्यासह २५ हजार पुणेकर नागरिकांची नामांकित डॉक्टरांकडून तपासणी व मोफत औषध तसेच मोफत उपचार व शस्त्रक्रिया शिबीर राबवले जाणार आहे,” असे उमेश चव्हाण यांनी नमूद केले.

डॉ. संजय ओक यांनी निवडीबद्दल आनंद व्यक्त करत प्रथमच अशा पद्धतीचे पहिले आरोग्य साहित्य संमेलन पार पडत असून, संमेलनाध्यक्षपदी माझी निवड झाल्याने अधिक जबाबदारी वाढली असल्याचे सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×