रामदास तडस यांनी स्वतःच्या गाडीतून जखमींना रुग्णालयात केले दाखल
marathinews24.com
वर्धा – दुचाकीच्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोन ज्येष्ठ महिलांसह एका जेष्ठाला भाजपच्या माजी खासदारांनी दाखविलेल्या समयसूचकतेने वेळीच रुग्णालयात दाखल केले आहे. रुग्णवाहिकेची वाट न पाहता त्यांनी गंभीर जखमींना तातडीने स्वतःच्या गाडीतून दवाखान्यात दाखल केले.
पुण्यातील तीन पोलिसांचे निलंबन, लाच स्वीकारणे पोलिसांना भोवले – सविस्तर बातमी
मोटारीतून वर्ध्याकडे प्रवास करत असलेले माजी खासदार रामदास तडस यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून तातडीने मदतीचा हात पुढे केला. बुट्टीबोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर हिंदी विश्व विद्यालयाजवळ एका दुचाकीचा अपघात घडला.घटनेचे गांभीर्य लक्षात घेता रुग्णवाहिकेची वाट न पाहता तडस यांनी स्वतःची गाडी थांबवून अपघातग्रस्तांना मदत केली. सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात जखमींना दाखल केले. यावेळी त्यांनी प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधून आवश्यक ती व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.
तसेच रुग्णालय प्रशासनालाही त्यांनी रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत यासाठी सर्वतोपरी मदतीचे निर्देश दिले. त्यांच्या तत्परतेमुळे अपघातग्रस्तांना वेळेत उपचार मिळाल्याने मोठा अनर्थ टळला.