Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

शेअर मार्केटमधील गुंतवणूकीच्या आमिषाने फसवणूक

वडिलांना मारहाण केल्याने तरुणाचा केला खून

शेअर मार्केटमध्ये मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून व्यक्तीला १२ लाखांचा गंडा

marathinews24.com

पुणे – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल, अशी बतावणी करीत तिघांनी मिळून एकाची तब्बल १२ लाखांची फसवणूक केली आहे. ही घटना जुलै २०२४ ते जुलै २०२६ कालावधीत कोंढव्यात घडली आहे. याप्रकरणी ४९ वर्षीय व्यक्तीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नामवंत कंपनीच्या नावे बनावट मीठाची विक्री; व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कोंढव्यात राहायला असून, आरोपीसोबत जुलै २०२४ मध्ये त्यांची ओळख झाली होती. शेअर मार्वेâटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल, अशी बतावणी सायबर चोरट्यांनी केली. त्यानंतर संबंधितांनी तक्रारदाराचा विश्वास संपादित करून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने, पैशांची मागणी केली. तब्बल १२ लाखांची आर्थिंक फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संजय चव्हाण तपास करीत आहेत.

रिक्षा प्रवासात महिलेचे ४ लाखांचे दागिने चोरीला

सहा आसनी रिक्षाप्रवासात महिला चोरट्यांनी धाराशिव जिल्ह्यातील ५१ वर्षीय महिलेच्या पर्समधील २० हजारांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असा ३ लाख ६८ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना १२ जुलैला दुपारी पावणेतीनच्या सुमारास हडपसर गाडीतळ ते कदमवाक वस्ती लोणी काळभोर प्रवासादरम्यान घडली आहे. याप्रकरणी संबंधित महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार चार महिलांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला मूळची धाराशिव जिल्ह्यातील सोनेगावातील रहिवाशी असून, १२ जुलैला दुपारी दोनच्या सुमारास हडपसर गाडीतळ ते कदमवाकवस्ती लोणी काळभोर असा सहाआसनी रिक्षातून प्रवास करीत होती. त्यावेळी रिक्षात बसलेल्या चार महिला चोरट्यांनी संबंधित तक्रारदार महिलेला हेरले. त्यांच्याकडील पर्समधील २० हजारांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असा ३ लाख ६८ हजारांचा ऐवज चोरून नेला. काही वेळानंतर महिलेला दागिन्यांची चोरी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×