Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

कुख्यात बंडू आंदेकरसह टोळीला ७ दिवसांची पोलीस कोठडी

आयुष आमचा नातू, हत्या का करू – आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद

marathinews24.com

पुणे – शहरात आयुष कोमकर तरुणाच्या हत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी आणखी सहा जणांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना १५ सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आयुषच्या हत्येप्रकरणी त्याचा आजोबा बंडू आंदेकरला मंगळवारी (दि.९) न्यायालयात हजर केले होते. आयुष हा बंडू आंदेकर यांचा नातू आहे, ते कशाला हत्या करतील? असा युतीवाद आंदेकरच्या वकिलांनी केला. आंदेकर यांचा या प्रकरणाशी काही संबंध नाही. आम्हाला याप्रकरणात अडकवले जात आहे. घरगुती वाद आहेत म्हणून नाव घेतले गेले, असेही त्यांनी न्यायालयात सांगितले.

पोलिसांमुळे गुंड सोमनाथ गायकवाडचे कुटुंबीय वाचले – सविस्तर बातमी

अटकेत असलेल्या आरोपींनी फौजदारी पात्र कट केला असून त्यांनी पिस्तुलाने गोळीबार करून खूनासारखा गंभीर गुन्हा केला आहे. आरोपी अमान पठाण याने यापूर्वी देखील एका गुन्ह्यात पिस्तूल पुरविले आहे. आरोपींचा गुन्हा करण्याचा उद्देश काय होता याचा तपास करायचा आहे. आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यामुळे गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील नीलिमा इथापे-यादव यांनी केला.

आरोपींतर्फे ॲड. मिथुन चव्हाण, ॲड. मनोज माने आणि ॲड. प्रशांत पवार यांनी बाजू मांडली. खून झालेला मुलगा बंडू आंदेकर यांचा नातू आहे. वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणात या गुन्ह्यातील फिर्यादीचे कुटुंबीय हे आरोपी आहेत. त्यामुळे या गुन्ह्यात आंदेकर आणि वाडेकर कुटुंबीयांना आरोपी करण्यात आले आहे. आंबेगाव पठार येथील रेकी प्रकरणात आमचे नाव नाही. या गुन्ह्‍यात काही जप्त करायचे बाकी नाही. त्यामुळे आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद ॲड. चव्हाण, ॲड. माने आणि ॲड. पवार यांनी केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. आर. बडवे यांनी आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

चौकशीसाठी बोलावले अन अटक केले, आमचा काही संबंध नाही-बंडू आंदेकर

न्यायालयाने बंडू आंदेकर याला पोलिसांच्या विरोधात काही तक्रार आहे का? असे विचारले. तेव्हा, हा सर्व प्रकार घडला तेव्हा मी केरळला होतो. चौकशीसाठी बोलावत मला अटक केली. मला या गुन्ह्यात गोवण्यात आले असून, यात माझा काहीही संबंध नाही, असे बंडू आंदेकर याने न्यायालयात सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×