शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या टोळीला बेड्या

शेअर बाजारातून भरघोस नफा देण्याचे आमिष; फसवणूक करणारी टोळी गजाआड, फसवणुकीत बँकेचा संचालक सामील

Marathinews24.com

पुणे – शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची १ कोटी ६० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीला सायबर पोलिसांनी अटक केली. वाघोली परिसरातील बँकेचा संचालकासह तांत्रिक सहायक कर्मचारी या गुन्ह्यात सामील असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. आरोपींनी बँक खात्यांचा वापर फसवणुकीच्या गुन्ह्यासाठी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी ६ जणांना अटक केली आहे.

गोविंद संजय सूर्यवंशी (वय २२, रा. वाघोली, नगर रस्ता, मूळ रा. हिंगोली), रोहित सुशील कंबोज (वय २३, रा. वाघोली, नगर रस्ता, मूळ रा. पंजाब), बाबाराव उर्फ ओंकार भवर (वय २२, रा. वाघोली, नगर रस्ता, मूळ रा. हिंगोली), जब्बरसिंह अर्जुनसिंह पुरोहित (वय ४५, रा. चऱ्होली, मूळ रा. धारावी, मुंबई), निखील उर्फ किशोर जगन्नाथ सावंत (वय ३२, रा. वाघोली, नगर रस्ता), केतन उमेश भिवरे (वय २७, रा. खराडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. न्यायालायने आरोपींना १२ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

कंपनीला बदनाम करण्याची धमकी देत २० लाखांची खंडणी मागितली

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने अनन्या गुप्ता असे नाव सांगणाऱ्या महिलेने ज्येष्ठाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता. गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाकडून वेळोवेळी १ लाख ६० हजार रुपये घेतले. ज्येष्ठाने आरोपींच्या बँक खात्यात पैसे जमा केले होते. त्यापैकी काही रक्कम वाघोलीतील बँक खात्यात जमा झाल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर संबंधित बँकेतील खातेधारक भिवरेला ताब्यात घेतले. तांत्रिक तपासात आरोपी गोविंद सूर्यवंशी, रोहित कंबोज, ओंकार भवर, जब्बरसिंह पुरोहित यांची नावे निष्पन्न झाली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक आयुक्त मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, उपनिरीक्षक संदीप कदम, मेमाणे, हवालदार चव्हाण, संदीप पवार, दिनेश मरकडे, यादव, नागटिळक, सचिन शिंदे, जमदाडे, सोनुने यांनी ही कामगिरी केली.

डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून फसवणूक

आरोपी गोविंद सूर्यवंशी वाघोलीतील विघ्नेश्वर मल्टीस्टेट को-ऑप बंँकेचा संचालक आहे. रोहित कंबोज या बँकेतील तांत्रिक सहायक (टेक्निशियन) आहे. डिगीव्हेंटरी, वननेस, रजत सेल नावाने त्यांनी डिजिटल मार्केटींग कंपनी सुरू केली होती. आरोपी सूर्यवंशी आणि कंबोज हे आभासी चलन गुंतवणूक व्यवहार करायचे. दोघांनी ही रकम जब्बरसिंह पुरोहित याच्याकडे दिली होती. बँक खात्याचा गैरवापर प्रकरणात निखिल सातव यालाही अटक केली आहे.

२९ गुन्ह्यांचा छडा; १५० बँक खात्यांचा वापर

सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यासाठी आरोपींनी १०० ते १५० बँक खात्यांचा वापर केला आहे. ‘नॅशनल सायबर क्राईम पोर्टल’वर त्यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या राज्यात २९ गुन्हे दाखल आहेत. पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी देशभरातील वेगवेगळ्या शहरात दाखल असलेल्या २९ गुन्ह्यांचा छडा लावला आहे. आरोपींचे दुबई, पश्चिम बंगाल, गुजरातमधील काही जणांशी लागेबांधे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शेअर बाजारात गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीला सायबर पोलिसांनी अटक केली. सायबर गुन्हे करताना आरोपींनी १०० ते १५० बँक खात्यांचा वापर केल्याचे उघडकीस आले आहे.– स्वप्नाली शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर पोलीस ठाणे, पुणे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top