Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

कोंढव्यात टोळक्याकडून दुकानात तोडफोड

पीएमपीएल प्रवासी महिलांचे दीड लाखांचे दागिने लांबविले

कोंढवा पोलिसांकडून टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – टोळक्याने दुकानात शिरून तोडफोड केल्याची घटना कोंढव्यात घडली आहे. दुकानाबाहेर लावलेल्या रिक्षाची तोडफोड करुन टोळक्याने दहशत माजविली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांकडून टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. फरमान फारूख अन्सारी (वय २८, रा. शांग्रीला अपार्टमेंट, कोंढवा खुर्द) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अरमान इलियास शेख याच्यासह पाच ते सहा साथीदारांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

दुभाजकावर आदळून रिक्षाचालकाचा मृत्यू, चांदणी चौकातील घटना – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्सारी यांचे कोंढव्यातील युनिटी पार्क परिसरात अमन सुपर मार्केट हे किराणा माल विक्रीचे दुकान आहे. रविवारी (२० जुलै) रात्री साडेनऊच्या सुमारास आरोपी अरमान आणि साथीदार दुकानात शिरले. त्यांच्याकडे तीक्ष्ण शस्त्रे होती. आरोपींनी दुकानातील चाॅकलेट, गोळ्यांच्या बरण्या फेकून दिल्या. दुकानातील खाद्यपदार्थ फेकून दिले. टोळक्याने दुकानातील सामानाची तोडफोड केली, तसेच दुकानाबाहेर लावलेल्या मुन्नवर इक्बाल खान यांच्या रिक्षाची तोडफोड करुन दहशत माजविली. त्यानंतर आराेपी दुचाकीवरुन पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक शिवराज खराडे तपास करत आहेत.

वाघोलीत मद्य विक्रीच्या दुकानात चोरी, पावणेतीन लाखांची रोकड लंपास

पुणे – शहरातील मद्य विक्री करणाऱ्या दुकानांचा दरवाजा उचकटून रोकड, तसेच मद्याच्या बाटल्या लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरट्यांनी नगर रस्त्यावरील वाघोली भागात असलेल्या एका मद्य विक्रीचा दरवाजा उचकटून दोन लाख ७० हजारांची रोकड, तसेच मोबाइल लांबविल्याची घटना उघडकीस आली. सागर निरंजनकुमार बत्रा (वय ३३, रा. लुंकड स्काय लाऊंज, कल्याणीनगर, येरवडा) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बत्रा यांचे नगर रस्त्यावरील केसनंद फाटा येथे सागर वाईन्स हे मद्य विक्रीचे दुकान आहे. रविवारी (२१ जुलै) मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाचा लोखंडी दरवाजा उचकटून आन प्रवेश केला. गल्ल्यातील दोन लाख ७० हजारांची रोकड आणि मोबाइल असा मुद्देमाल लांबवून चोरटे पसार झाले. सोमवारी सकाळी मद्य विक्री दुकानाचा दरवाजा उचकटून गल्ल्यातील रोकड लांबविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेण्यात आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन तपास करत आहेत. वारजे माळवाडी भागातील एका मद्य विक्री दुकानाचा दरवाजा उचकटून चोरांनी गल्ल्यातील ११ हजारांची रोकड लांबविल्याची घटना शनिवारी (१९ जुलै) घडली. गेल्या पंधरा ते वीस दिवसांत कल्याणीनगर, येरवडा, कोंढवा भागातील मद्य विक्रीची दुकाने फोडून चोरट्यांनी मद्याच्या बाटल्या, तसेच रोकड लांबविल्याच्या घटना घडल्या.

पिसोळीत घरफोडी, साडे तीन लाखांचा ऐवज लंपास

कोंढव्यातील पिसोळी परिसरात एका घरातून चोरट्यांनी ३ लाख ५५ हजारांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना घडली. याबाबत सचिन दत्तात्रय गोडावळे (वय ४५, रा. पिसोळी) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोडावळे यांचे पिसोळीतील दत्त मंदिराजवळ बैठे घर आहे. रविवारी (२० जुलै) सायंकाळी गोडावळे यांचे घर बंद होते. चोरट्यांनी घराचा पत्रा वाकविला. पत्रा वाकवून चोरटे घरात शिरले. चोरट्यांनी कपाटातील तीन लाख ५५ हजारांचे सोन्याचे दागिने लांबविले. रविवारी रात्री गोडावळे कुटुंबीय घरी आले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. सहायक पोलीस निरीक्षक अब्दागिरे तपास करत आहेत.

चेष्टा केल्याने तुंबळ हाणामारी

चेष्टा मस्करी केल्याने एकाला बेदम मारहाण केल्याची घटना महात्मा फुले पेठेत घडली. याप्रकरणी दहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत शंकर सुरेश राठोड (वय ३५, रा. सूर्यविकास मंडळासमोर, महात्मा फुले पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अजय साका, मोहन पुजारी, अनंत धर्मकांबळे, परशुराम पुजारी, महेश पुजारी, नरसिंह पुजारी, करण पुजाीर, अशोक धनगर, सौरभ राजहंस, नरेश धर्मकांबळे (रा. सूर्यविकास मंडळासमोर, महात्मा फुले पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शंकर राठोड हे महेश पुजारी याच्या घरी रविवारी रात्री आषाढ पार्टी करत होते. दोघांनी दारु प्याली. सूर्यविकास मंडळाचा अध्यक्ष अजय साका याची राठोड यांनी चेष्टा केली. त्याच्या डोक्यात टप्पल मारली. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. वादातून साका आणि साथीदारांनी राठोड यांना बेदम मारहाण केली. मारहाण सुरू असताना राठोड यांच्या आईने मध्यस्थी केली. तेव्हा आरोपी मोहन पुजारी याने राठोड यांच्या आईला ढकलून दिले. ढकलून दिल्याने त्यांचा हात फ्रॅक्चर झाला. पोलीस हवालदार वणवे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×