ढोले पाटील कॉलेजच्या गौरी गरुडचा किक बॉक्सिंगमध्ये जिल्ह्यात डंका – विभागीय स्पर्धेसाठी निवड
marathinews24.com
पुणे – महानगरपालिका शिक्षण विभाग व जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय जिल्हास्तर किक बॉक्सिंग स्पर्धा २०२५–२६ नुकतीच आंबेगाव बुद्रुक येथे पार पडली. स्पर्धेत ढोले पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्सच्या विद्यार्थिनी गौरी गरुड हिने उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी तिची निवड झाली असून, महाविद्यालयात आनंदाचे वातावरण आहे.
जकातदार यांचे ज्योतिष शास्त्रातील कार्य मोलाचे- उदयराज साने – सविस्तर बातमी
यशाबद्दल चेअरमन सागरजी ढोले पाटील यांनी गौरव व्यक्त करत सांगितले की, “विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, योग्य प्रशिक्षण आणि सतत प्रेरणा मिळाली तर ते कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकतात. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. विठ्ठल गायकवाड यांनी गौरी गरुड हिचे अभिनंदन करून शासनाच्या विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. गौरीच्या या यशामागे तिचे मेहनत, समर्पण आणि संस्थेचे प्रेरणादायी वातावरण आहे. संपूर्ण ढोले पाटील परिवाराने गौरीचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.



















