Breking News
पत्नीच गळा दाबुन जीवे मारण्याचा प्रयत्नमागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा जलयुक्त शिवार तीनमध्ये प्राधान्य मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपुण्यात राहुल गांधीच्या “छात्रों की गुंज” कार्यक्रमासाठी अटी घालून परवानगीव्हाट्सएपच्या स्टेट्समुळे पुण्यात अल्पवयीन मुलाचा निर्घुन खूनकोरेगाव भीमा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा मार्ग मोकळापुण्यात आध्यात्मिक गुरहणे तरूणीचे अर्धनग्न फोटो मागून घेतलेसुकन्या समृद्धी योजनेत मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणुकीचे आवाहनपिंपरी चिंचवड परिसरातील भूसंपादनाची प्रलंबित कामे ३१ ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करावेतवयस्कर  शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची विशेष सुविधासहकारनगरात स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; ५ महिलांची सुटका

कुख्यात बंडू आंदेकरच्या घरात सापडले कोट्यावधींचे सोनं

खुनाच्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे

marathinews24.com

पुणे – कुख्यात गुंड बंडू आंदेकर याच्या घर झडतीमध्ये पोलिसांना कोट्यावधी रुपयांचे घबाड मिळून आले आहे. त्यामध्ये ६७ लाखांचे दागिने, चांदी, २ लाख ५० हजारांची रोकड, अलिशान मोटार, करारनामे, टॅक्स पावत्याचा समावेश आहे. तसेच त्याने केलेल्या जमीन व्यवहाराच्या काही इसार पावत्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. दरम्यान आयुष कोमकर याच्या खुनाचा तपास आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

कुख्यात आंदेकर टोळीला मोक्का कारवाईचा दणका – सविस्तर बातमी

गुंड बंडू आंदेकर याने कट रचून स्वतःच्याच नातवावर हल्लेखोरांकडून गोळीबार केला. त्याच्यावर पिस्तूलातून गोळ्यांचा वर्षाव करीत महाविद्यालयीन तरुण आयुष उर्फ गोविंद गणेश कोमकर (वय १९, रा. नाना पेठ) याचा खून केला. ही घटना गणेश विसर्जन पूर्वसंध्येला (दि. ५ ) रात्री पावणे आठच्या सुमारास नाना पेठेत घडली. त्यानंतर आंदेकर हा ट्रॅव्हलने प्रवास करत कुटुंबाला घेऊन देव दर्शनाला गेला होता. दरम्यान, याप्रकरणी आतापर्यंत गुन्हे शाखेने ८ जणांना अटक केली असून उर्वरित पाच जणांच्या शोधार्थ गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके कार्यरत आहेत. अटकेतील आरोपी बंडू आंदेकरच्या घराची पोलिसांनी १० सप्टेंबरला संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सर्च ऑपरेशन राबवले. संबंधित सर्च ऑपरेशन गुरुवारी (दि.११) पहाटे चार वाजेपर्यंत सुरू होते. त्यामध्ये पोलिसांच्या हाती कोट्यावधी रुपयांचे घबाड लागले आहे. त्यानुसार आता पोलिसांकडून तपासाला देण्यात आली आहे.

खुनाच्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे

महाविद्यालयीन तरुण आणि बंडू आंदेकरचा नातू आयुष्य कोमकर (वय १९) याच्या हत्येचा तपास समर्थ पोलिसांकडून आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. मागील सहा दिवसांपासून समर्थ पोलिसांकडून तपास केला जात होता. आता या खुनाचा तपास गुन्हे शाखा करणार असून, उर्वरित आरोपींना अटक करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. त्यासोबतच आंदेकर टोळीला या गुन्ह्यात मदत करणाऱ्या सर्व आरोपींची पोलिसांकडून कुंडली तपासली जाणार आहे. त्यानुसार कारवाईचा बडगा उभारला जाणार असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सर्च ऑपरेशनमध्ये सापडलेले घबाड

खुनातील आरोपी बंडू आंदेकर याच्यासह इतर आरोपींच्या घरात पोलिसांनी तब्बल ११ तास सर्च मोहीम राबवली. आतापर्यंत पुणे पोलिसांच्या कारवाईतील सर्वात जास्त वेळ झालेली ही सर्च मोहीम आहे यामध्ये अडीच लाख रुपयांची रोकड, ७७० ग्रॅम सोन्याचे दागिने, ६७ लाखाची चांदी, पोलो मोटार, अनेक करारनामे, जागा खरेदीच्या पावत्या, काही मोबाईल सापडले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×