Breking News
विद्यार्थिनींचा छळ म्हणजे संवेदनहिनतेचं भयंकर उदाहरण- डॉ. नीलम गोऱ्हेअण्णाभाऊ साठे साहित्यभूषण पुरस्काराने विक्रम शिंदे सन्मानितधर्मवीर गडावर संभाजी महाराजांची सृष्टी उभारावीआई-मुलाच्या नात्यावर फुंकर घालणारे ‘पेरले’ गीत रसिकांच्या भेटीलाCrime News : शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूकीचे आमिष पडले ४० लाखांनाPune – नवले पुलाजवळ अपघातात दुचाकीवरील सहप्रवाशी ठारआई-बाबांवरील रागाने तिने गाव सोडले; पण पुणे पोलिसांमुळे आयुष्य वाचलेआर्थिक शिस्तीचे पालन करीतच राज्याचा अर्थकारभार-उपमुख्यमंत्री अजित पवारपुणे शहरातील गुन्हेगारीत प्रचंड वाढयूपीएससी-२०२४ यशस्वितांचा सत्कार सोहळा १२ जुलैला

‘अभंगरंग’ अभंग गायन कार्यक्रमास चांगला प्रतिसाद

'अभंगरंग' अभंग गायन कार्यक्रमास चांगला प्रतिसाद

‘अभंगरंग’ मधून भक्तिरसाचा आविष्कार !

marathinews24.com

पुणे – भारतीय विद्या भवन, इन्फोसिस फाउंडेशन आणि संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अभंगरंग’ या अभंग गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन दि. ४ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता येथे करण्यात आले. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमात भक्तिरसात न्हालेल्या अभंग गायनाने रसिकांची मने जिंकली आहेत त्यामुळे  ‘अभंगरंग’ अभंग गायन कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे. गुरुकुलच्या युवा गायिका अनुष्का साने, रसिका पैठणकर आणि नुपूर देसाई यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली. गीत इनामदार (तबला), आकाश नाईक(हार्मोनियम), स्वप्नील सूर्यवंशी (पखवाज) आणि आनंद टाकळकर (तालवाद्य) यांनी गायिकांना साथसंगत केली , तर कार्यक्रमाचे भावपूर्ण निरूपण ह. भ. प. मानसी बडवे यांनी केले.

बिग बॉस फेम अभिनेत्रीचे “माय गो विठ्ठल” हे भक्तिगीत प्रदर्शित – सविस्तर बातमी 

‘जय जय राम,कृष्ण हरी’ या गजराने कार्यक्रमाची सुरुवात झाली.अनुष्का साने यांनी ‘अवघे गर्जे पंढरपूर,पाहावा नयनी’,’छंद लागला’ हे अभंग सादर केले.रसिका पैठणकर यांनी ‘एकच रे मागणे’,’श्रीरंगा’,’जोहार’ हे अभंग सादर केले. नुपूर देसाई यांनी ‘रूप पाहता लोचनी’,’अवघाचि संसार’,’परब्रम्हम निष्काम ‘हे अभंग सादर केले.’अगा वैकुंठच्या राया ‘ या अभंगाने सांगता झाली.सांस्कृतिक प्रसाराच्या उपक्रमांतर्गत भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सादर होणारा हा २५१ वा कार्यक्रम ठरला.कार्यक्रमास पुणेकर रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. प्रवेश विनामूल्य होता. पुणेकर रसिक,भाविकांनी या भक्तिपर्वाचा लाभ घेतला.

भारतीय विद्या भवन पुणे केंद्राचे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी ज्ञानेश्वरीची प्रत देऊन कलाकारांचा सत्कार केला.संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठान चे गोविंद बेडेकर,महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे माजी प्रमुख अभियंता अविनाश शेटजी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top