Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

ग्रामपंचायत सेवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

पोलिसांकडून आरोपीना अटक होत नसल्याने केले कृत्य

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – जिल्ह्यातील गेवराईतील नांदलगाव येथील ग्रामपंचायत सेवक जालिंदर सुरवसे याला ६ डिसेंबरला गावातील गावगुंडानी बेदम मारहाण केली. त्याचे हातपाय मोडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी तलवाडा पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता .मात्र दोन महिन्यांपासून मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक होत नसल्याने कर्मचाऱ्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी २० जानेवारीला पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देत आरोपीना अटक करण्यासाठी निवेदन दिले होते.

विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार; २६ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

अटक न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता, मात्र जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी याप्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे .एवढी बेदम मारहाण होऊन सुद्धा मोकाट आरोपीना पोलिसांकडून अटक होत नसल्याने संतापलेल्या ग्रामपंचायत सेवक जालिंदर सुरवसे यांनी २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत सुरवसे यांनी अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

जिल्हाधिकारी कार्यालया समोर प्रजासत्ताक दिन असल्यामुळे नागरिकांची गर्दी आणि पोलीस प्रशासनाचा मोठा बंदोबस्त होता. घटनेने पोलीसांची धावाधाव झाल्याने हा प्रकार अनर्थ टळला. मात्र आरोपीना पोलीस प्रशासनाकडून अटक होत नसल्याने आणि सुरवसे कुटुंबीयांना न्याय मिळत नसल्याने सुरवसेच्या कुटूबियांना टाहो फोडत अश्रूचा बांध फुटल्याने पोलीस प्रशासन कडून राजकीय दबावापोटी मोकाट फिरणाऱ्या अरोपींना अटक कधी होणार आणि सुरवसे कुटूंबाला न्याय मिळणार? असा सवाल देखील नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे .अंगावर पेट्रोल ओतून घेतल्यामुळे जालिंदर सुरवसेला तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.आरोपीना अटक करण्याची मागणी सुरवसे यांच्या नातेवाईकांकडून आणि जिल्ह्यातील नागरिकांकडून होत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×