सारसबाग येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन
marathinews24.com
पुणे – संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील अग्रणी, श्रमिक वर्गाचे महान प्रवक्ते आणि क्रांतीकारक विचारांचे स्फूर्तिदायक व्यक्तिमत्त्व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. सारसबाग येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महसूल सप्ताहाचा शुभारंभ – सविस्तर बातमी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजातील शोषित, वंचित आणि दलित वर्गाच्या न्यायासाठी आयुष्य वेचले. त्यांनी दिलेले सामाजिक समतेचे आणि बंधुतेचे संदेश आजही तितकेच महत्वाचे आणि प्रेरणादायी आहेत.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर करण्याचा आणि सामाजिक न्यायासाठी त्यांच्या मार्गावर चालण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष दत्ता घुले, समन्वयक पराग थोरात, विभागप्रमुख सूरज लोखंडे, रूपेश पवार, निलेश वाघमारे, संदीप गायकवाड, नागेश खडके, सूरज खंडाळे, अमोल घुमे, महेश चव्हाण, विजय रावडे, राम बटुंगे, दिलीप पोमन, पुरुषोत्तम विटेकर, राहुल शेडगे, गणेश पोकळे, नितीन थोपटे, शिवाजी मेलेकरी, रोहित कुचेकर, महिला आघाडी च्या विद्या होडे, पद्मा सोरटे, रोहिणी कोल्हाळ, सुलभा तळेकर, करुणा घाडगे, सीमा गायकवाड, ज्योती वीर, उपस्थित होते.



















