पोलिसांना गुंगारा देणार्या सराईताला विमानतळ पोलिसांनी केली अटक
marathinews24.com
पुणे – महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्क) कारवाई झाल्यानंतर पोलिसांना गुंगारा देणार्या सराईताला विमानतळ पोलिसांनी अटक केली. फिरोज कुतूब खान (वय २६, रा. एसआरए बिल्डींग, विमाननगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. खान सराइत आहे. खान याच्यासह साथीदारांविरुद्ध विमानतळ पोलिसांनी मोक्काअन्वये कारवाई केली होती. कारवाई केल्यानंतर खान पसार झाला होता. गेले तीन महिने तो पोलिसांना गुंगारा देत होता.
गोदाम फोडून तांब्याच्या तारा चोरणार्या टोळीला अटक – सविस्तर बातमी
खान विमाननगर भागातील एसआरए बिल्डींग परिसरात येणार असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस कर्मचारी शैलेश नाईक आणि रुपेश पिसाळ यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय संकेश्वरी, गु्न्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक आशालता खापरे, सहायक निरीक्षक विजय चंदन, पिसाळ, नाईक, राकेश चांदेकर, अंकुश जोगदंडे, दादासाहेब बर्डे, योगेश थोपटे, ज्ञानदेव आवारी, हरिप्रसाद पुंडे, लालू कर्हे यांनी ही कामगिरी केली.