Breking News
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यूबिबवेवाडीत पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्याविरुद्ध धडक कारवाई – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीवाघोलीत महावितरणचा ट्रान्सफाॅर्मर चोरीबुद्ध पौर्णिमेनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाहतूक बदलशेतकरी उत्पादक कंपन्यामार्फत शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीसायबर चोरट्यांचा पुणेकरांना दणका, ३ घटनांमध्ये ७६ लाखांची फसवणूकएटीएममधून रोकड काढणाऱ्या ज्येष्ठाची फसवणूकयेरवड्यातील तारकेश्वर पुलाचे दुरस्तीचे कामपुणे शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागूपुणे : मंडप साहित्य केंद्रातून दोन लाखांची चोरी 

हातबॉम्बची विक्री प्रकरण, आरोपीला कारावासची शिक्षा…

वाकड पोलिसांनी केली होती अटक

marathinews24.com

पुणे – हातबॉम्बची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश जे. जी. डोरले यांनी दोन महिन्यांचा साधा कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विकी अशोक सावंत (वय २४, रा. शिवकृपा कॉलनी, नढेनगर, काळेवाडी) असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. वाकड पोलिसांचे पथक वाकड भागात ९ सप्टेंबर २०१५ रोजी गस्त घालत असताना सावंतला पकडले होते. तो हातबाँम्ब विक्रीच्या तयारीत असल्याची माहिती तपासात उघडकीस आली.

पुण्यातील दोन महसूल अधिकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल – सविस्तर बातमी

पोलिसांच्या पथकाने सापळा रचून विकी सावंत याला पकडले. त्याची झडती घेतली असता, रूमालात हातबाँम्ब ठेवल्याचे आढळून आले. त्यानंतर बॉम्ब शोधक नाशक पथकाला (बीडीडीएस) घटनास्थळी पाचारण करण्यात आली. बीडीडीएसच्या पथकाने सावंतकडून बाँम्ब ताब्यात घेतला. तेव्हा गावठी बनावटीचा हातबाँम्ब जिवंत असल्याचे तपासणीत आढळून आले. याचा अहवाल पोलिसांकडे देण्यात आला. सावंत याच्याविरुद्ध बेकायदा हातबाँम्ब बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली होती. त्याच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. तत्कालिन पोलीस निरीक्षक अमृत मराठे यांनी याप्रकरणाचा तपास केला होता.

खटल्यात सरकार पक्षाकडून अतिरिक्त सरकारी वकील वामन कोळी यांनी बाजू मांडली. सरकार पक्षाकडून या खटल्यात नऊ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली होती. तपास अधिकारी, तसेच बॉम्बशोधक नाशक पथकातील अधिकार्‍यांची साक्ष महत्त्वाची ठरली. साक्ष, तसेच पुरावे ग्राह्य धरुन सावंत याला दोन महिने साधा कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top