Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती तालुक्यात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन- अधिष्ठाता डॉ.अंजली पाटील

अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ : उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्यासह माजी सदस्यांवरील शोकप्रस्ताव

गरजू रुग्णांना या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार व मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वैद्यकीय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या अधिनस्त राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व संलग्नित रुग्णालयांमार्फत दि. १६ जुलै ते २५ जुलै २०२६ या कालावधीत “आरोग्य तपासणी व विशेष आरोग्य शिबिर अभियान” आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभुमीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, बारामती यांच्यावतीने १६ जुलै ते २५ जुलै २०२६ पर्यंत तालुक्यातील विविध ठिकाणी विशेष मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामती तालुक्यात प्रशासनाच्यावतीने स्वागत – सविस्तर बातमी

या शिबीरामध्ये विशेषतः रक्तदान शिबीर, नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्रक्रिया, गर्भाशय व मुख कर्करोग तपासणी, स्तन कर्करोग तपासणी, दुर्बिणीद्वारे (लॅप्रोस्कॉपीक) हर्निया शस्रकिया व स्थुलता तपासणी आदी आरोग्य विषयक शिबिरांचा समावेश आहे. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत सर्वसाधारण आरोग्य तपासणी, स्त्रीरोग व प्रसूती, नेत्ररोग, शल्यचिकित्सा, औषधोपचार, मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी, हृदयरोग सल्ला तसेच आवश्यकतेनुसार पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याशिवाय रक्तदान व विविध आरोग्यविषयक योजनांची माहिती तसेच आवश्यक तपासण्यांची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

बारामती शहर तसेच ग्रामीण भागातील गरजू रुग्णांनी विशेष आरोग्य शिबीरात सहभागी होऊन त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील आणि वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजेश उमप यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×