Breking News
पत्नीच गळा दाबुन जीवे मारण्याचा प्रयत्नमागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा जलयुक्त शिवार तीनमध्ये प्राधान्य मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपुण्यात राहुल गांधीच्या “छात्रों की गुंज” कार्यक्रमासाठी अटी घालून परवानगीव्हाट्सएपच्या स्टेट्समुळे पुण्यात अल्पवयीन मुलाचा निर्घुन खूनकोरेगाव भीमा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा मार्ग मोकळापुण्यात आध्यात्मिक गुरहणे तरूणीचे अर्धनग्न फोटो मागून घेतलेसुकन्या समृद्धी योजनेत मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणुकीचे आवाहनपिंपरी चिंचवड परिसरातील भूसंपादनाची प्रलंबित कामे ३१ ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करावेतवयस्कर  शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची विशेष सुविधासहकारनगरात स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; ५ महिलांची सुटका

पुण्यात उच्चपदस्थ महिला अधिकार्‍याचे अंघोळीचे व्हिडिओ केले रेकॉर्ड

पुण्यात उच्चपदस्थ महिला अधिकार्‍याचे अंघोळीचे व्हिडिओ केले रेकॉर्ड

पतीनेच बाथरूमध्ये बसविला स्पाय कॅमेरे

marathinews24.com

पुणे – उच्चपदस्थ पत्नीवर नजर ठेवण्यासाठी अधिकार्‍याने स्वतःच्याच घरातच स्पाय कॅमेरा बसविला. तसेच त्याने पत्नीच्या अंघोळीचा व्हिडीओ रेकॉर्ड करून तिला ब्लॅकमेल केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी महिलेने आंबेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार क्लास वन अधिकार्‍यासोबत ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

ऑनलाइन पुजेच्या आमिषाने ५ लाखांचा गंडा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला उच्चपदस्थ अधिकारी असून, लग्न झाल्यापासून आरोपी पती तिच्यावर संशय घेत होता. तिचा छळ करीत शिवीगाळ करणे, मारहाण करीत मानसिक त्रास देत होता. माहेरहून दीड लाख रुपये आणण्यासाठी जबरदस्ती करत होता. याप्रकरणी ३० वर्षीय क्लास वन ऑफिसर असलेल्या पत्नीने आंबेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये सासू, सासरे, दीर आणि इतर नातेवाईकांचा समावेश आहे.

पत्नीवर नजर ठेवण्यासाठी स्पाय कॅमेरा

पीडितेचे आरोपीसोबत सन २०२० मध्ये पीडितेचे लग्न झाले होते. त्यानंतर काही वर्षात पती पीडित पत्नीवर संशय घेत होता. त्यानंतर त्याने तिला त्रास द्यायला सुरुवात केली. वारंवार पैशासाठी शिवीगाळ करणे, मारहाण केली. तिच्यावर नजर ठेवण्यासाठी घरात, बाथरूमध्ये स्पाय कॅमेरेदेखील बसवून घेतले होते. पत्नीच्या अंघोळीचे व्हिडीओ रेकॉर्ड करून ते व्हायरल करण्याची धमकी त्याने पत्नीला दिली. गाडी आणि घराच्या हफ्त्यासाठी दीड लाख रुपये माहेरून आणण्यासाठीही त्याने जबरदस्ती केली. पतीकडून मानसिक आणि शारिरीक छळ होत असल्याचा आरोप करत पीडितेने पोलिसात धाव घेतली आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलीस तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×