Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषणला ढोल-ताशांची ऐतिहासिक मानवंदना

१४ सप्टेंबरला कार्यक्रमाचे आयोजन

marathinews24.com

पिंपरी – पिंपरी शहरातील मोशी-बोऱ्हाडेवाडी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे जगातील सर्वांत उंच पूर्णाकृती शिल्प उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या शिल्पामुळे शिव-शंभू विचार आणि हिंदवी स्वराज्याच्या जाज्वल्य इतिहासाला पुन्हा एकदा उजाळा मिळणार आहे. त्याठिकाणी भव्य ‘‘शंभूसृष्टी’’ सुद्धा उभारण्यात येत आहे. आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या पुढाकाराने हे अतिभव्य शिल्प पिंपरी-चिंचवडसह राज्याच्या वैभवामध्ये भर घालणार आहे.

आता प्रत्येक ग्रामपंचायतीत आपले सरकार सेवा केंद्र उपलब्ध – सविस्तर बातमी

ऐतिहासिक शिल्पाचे अनावरण लवकरच करण्यात येणार असून, शिल्पाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्याप्रती अपार श्रद्धा आणि निष्ठा असलेल्या शिव-शंभू प्रेमींच्या आग्रहाने ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’’ ला ढोल-ताशांच्या गजरामध्ये ऐतिहासिक मानवंदना देण्यात येणार आहे. या माध्यमातून ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’बाबत जनजागृती व्हावी, असा मानस संघटनेचा आहे.

शिव-शंभूंच्या विचारांचा जागर व्हावा. यासाठी आयोजित उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन आमदार आणि हिंदूभूषण स्मारक ट्रस्ट, पिंपरी चिंचवडचे महेश किसनराव लांडगे यांनी केले आहे.

स्थळ : ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’, बोऱ्हाडेवाडी मोशी, पिंपरी-चिंचवड, पुणे
वेळ-दि. १४ स्पटेंबर २०२५ दुपारी – ४ वाजता.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×