गिरीश दोशी यांच्या ‘नाईन हाऊसेस’ पुस्तकाचे प्रकाशन
marathinews24.com
पुणे – आर्किटेक्ट्स, इंजिनिअर्स अँड सर्व्हेयर्स असोसिएशन (एईएसए), पुणे तर्फे शिक्षक दिन, आर्किटेक्ट दिन आणि अभियंता दिनाचे एकत्रित औचित्य साधत ज्येष्ठांचा सन्मान सोहळा सोमवार, १३ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, कर्वेनगर येथे उत्साहात पार पडला.
मध्यस्थी : वाद मिटविण्याचा सौहार्दपूर्ण मार्ग -सविस्तर बातमी
या समारंभात वास्तुकला आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील चार मान्यवरांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ आर्किटेक्ट गिरीश दोशी, आर्किटेक्ट प्रशांत देशमुख, आर्किटेक्ट सुरेश श्रीधर आठवले आणि अभियंता सुभाष देशपांडे यांना या वर्षीचा एईएसए गौरव प्रदान करण्यात आला. शिक्षण, डिझाईन आणि व्यावसायिक प्रॅक्टिस क्षेत्रातील त्यांच्या योगदानाने असंख्य विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना दिशा दिली असून पुणे आणि महाराष्ट्राच्या वास्तुकला क्षेत्राला मोठा ठेवा मिळाला आहे.
आर्किटेक्ट गिरीश दोशी यांच्या ‘नाईन हाऊसेस’ या नव्या पुस्तकाचे प्रकाशन या सोहळ्यातच करण्यात आले. हे पुस्तक पुरस्कारप्राप्त मान्यवर आणि एईएसए कार्यकारिणी सदस्यांच्या हस्ते, यांच्या उपस्थितीत प्रकाशित झाले.त्यांनी वास्तुकलेबद्दल सविस्तर सादरीकरण करून मार्गदर्शन केले.
समारंभात एईएसएचे अध्यक्ष राजीव राजे, चेअरमन महेश बांगड आणि कार्यकारिणी सदस्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. उपाध्यक्ष संजय तासगावकर यांनी आभार मानले.दिवाकर निमकर, पराग लकडे,विकास भंडारी, जयंत इनामदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी संस्थेच्या वतीने शिक्षण, डिझाईन आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यकर्त्यांचा गौरव करण्याची परंपरा कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. समाजातील गुरु आणि मार्गदर्शक यांच्या योगदानाचे स्मरण करत त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याचा हा उपक्रम असल्याचे आयोजकांनी सांगितले. १९७० पासून कार्यरत असलेल्या एईएसए संस्थेने शिक्षक दिन, आर्किटेक्ट दिन आणि अभियंता दिन एकत्र साजरे करण्याची परंपरा सुरू केली असून, या वर्षीचा सोहळा या उपक्रमाचे तिसरे यशस्वी वर्ष ठरले.



















