Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात;आगीत ५ जणांचा होरपळून मृत्यू

पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात;आगीत ५ जणांचा होरपळून मृत्यू

कंटेनर चालकाने ८ ते १० वाहनांना उडवले

marathinews24.com

पुणे – कंटेनर चालकाचे नवले पुलाजवळ नियंत्रण सुटून अपघात झाला. संबंधित चालकाने ६ ते ८ वाहनांना पाठीमागून धडक दिल्यामुळे लागलेल्या आगीत ५ जणांचा जागीच जळून मृत्यू झाला. तर १० ते १२ जण गंभीररित्या जखमी झाले असून, अपघाताची घटना गुरूवारी (दि. १३) संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घडली आहे. घटनास्थळी अग्निशमक दलाच्या जवानांसह सिंहगड रस्ता पोलीस, वाहतूक पोलिसांनी बचावकार्य सुरू केले आहे. जखमींना तातडीने जवळच्या रूग्णालयात दाखल केले आहे.

दिव्यांग कल्याण क्षेत्रात कामकरणाऱ्या संस्थांनी नोंदणी करणे अनिवार्य : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी – सविस्तर बातमी   

अवजड साहित्य भरून कंटेनर चालक साताराहून मुंबईच्या दिशेने जात होता. नवले पुलाजवळील सेल्फी पॉइंटजवळ नियंत्रण त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे त्याने पुढील वाहनांना धडक देण्यास सुरूवात केली. जवळपास ६ ते ८ वाहनांना संबंधित कंटेनर चालकाने उडवल्यामुळे पुढील वाहनांना आग लागली. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. कंटेनच्या धडकेत मोटार अडकल्यामुळे त्यातील दोन प्रवाशांना बाहेर पडला आले नाही. त्यामुळे होरपळून त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. दरम्यान, ट्रकसह इतर वाहनांतील आणखी तिघांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अपघातामुळे मुंबईच्या दिशेने जाणार्‍या रांगेत प्रचंड मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या होत्या. त्यापार्श्वभूमीवर परिसरातील वाहतूक बंद ठेवण्यात आली. तसेच साताराहून मुंबईच्या दिशेने जाणारी लेन वाहतूक पोलिसांनी दोन तासांसाठी बंद ठेवली होती.

आरडाओरड, गलक्याने भयावह स्थिती

कंटेनर चालकाने अनेक वाहनांना पाठीमागून धडक दिल्यामुळे आग लागली होती. त्यातच काही चालकांसह प्रवाशी गाडीतच अडकल्यामुळे ते मदतीची याचना करीत होते. मात्र, आगीचे लोट मोठ्या प्रमाणावर पसरल्यामुळे त्यांच्या मदतीला स्थानिक धावले नाही. अग्निशमक दलाचे जवान घटनस्थळी पोहोचेपर्यंत वाहनांतील प्रवाशांचा जीव गेला. दरम्यान, घटनास्थळी प्रवाशांसह स्थानिकांकडून आरडाओरड केली जात होती. गलक्यामुळे भयावह वातावरण निर्माण झाले होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×