Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

दिव्यांग कल्याण क्षेत्रात कामकरणाऱ्या संस्थांनी नोंदणी करणे अनिवार्य

दिव्यांग कल्याण क्षेत्रात कामकरणाऱ्या संस्थांनी नोंदणी करणे अनिवार्य

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

marathinews24.com

पुणे – दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मधील कलम ४९-५३ नुसार दिव्यांगांच्या कल्याण पुनर्वसन आणि सक्षमीकरण क्षेत्रात काम करणा-या नागरी समाज संघटना/ संस्थांची नोंदणी अनिवार्य आहे. यासाठी आयुक्त, दिव्यांग कल्याण महाराष्ट्र राज्य, पुणे यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात करण्यात आलेले असल्याचे जितेंद्र डुडी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हास्तरीय समिती दिव्यांग यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागा खऱ्या ओबीसींनाच मिळाव्यात – सविस्तर बातमी 

शासन निर्णय दि.१७ ऑक्टोंबर २०२५ नुसार कोणतीही व्यक्ती अथवा नागरी समाज संघटना, संख्या दिव्यांग क्षेत्रात वैध नोंदणी शिवाय कार्य करू शकत नाही. जिल्हयातील ज्या व्यक्ती,संस्था,संघटना यांना दिव्यांग क्षेत्रात कार्य करावयाचे आहे. त्यांनी ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत आयुक्त दिव्यांग कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडे नोंदणी करावी व नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे, असेही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी कळविले आहे.

आयुक्त, दिव्यांग कल्याण यांचेकडे नोंदणी नसलेल्या संस्था, व्यक्ती दिव्यांग क्षेत्रात कार्यरत असल्याचे दिसून आल्यास संबंधिताविरुदध दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मधील कलम ९१ नुसार व इतर अनुषंगिक कायद्यानुसार कारवाईस पात्र असतील. अधिक माहितीसाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे येथे संपर्क साधावा.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×