Breking News
पीएमपी बसच्या धडकेत सायकलवरील एकाचा मृत्यूमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्यमेफेड्रोन विक्री प्रकरणात तिघे अटकेतपुणेकर ग्राहकांसाठी भांडारकर रस्त्यावर सुरु झाले ‘निरुपाज् येवला पैठणी अँड सिल्क सारीज’चे दालनराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते ‘ग्रीन क्रुसेडर्स आणि अचिव्हर्स पुरस्कार’ वितरणबार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा

नारायण ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चे उद्घाटन

भारताची टॉप-रँकिंग शैक्षणिक प्रणाली आता पुण्यात: प्रमिला पी.

marathinews24.com

पुणे – आशियातील अग्रगण्य शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या नारायण ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या वतीने पुण्यात ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ (सीओ) सुरु करण्यात आले आहे. सेव्हन लव्ह्ज चौक, स्वारगेट पुणे येथे उभारलेल्या या केंद्राचे उद्घाटन रविवारी झाले. या केंद्रामुळे पुणे व परिसरातील विद्यार्थ्यांना देशपातळीवरील टॉप रँक घडवणारी नारायणची सिद्ध शैक्षणिक प्रणाली उपलब्ध होणार आहे.

मुलांमध्ये नाट्यत्मकता रुजविण्याच्या चळवळीत शिक्षक-पालकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा-मिलिंद सबनीस – सविस्तर बातमी

नारायण ग्रुपच्या पॅन-इंडिया अकॅडमिक हेड प्रमीला पी. यांच्या हस्ते उद्घाटन झाले. प्रसंगी महाराष्ट्र अकॅडमिक हेड जयसिम्हा रेड्डी, मुंबई ‘सीओ’चे प्राचार्य भूषण जमसंडेकर, अंधेरी ‘सीओ’चे अकॅडमिक डीन सिद्धेश नाईक, उपाध्यक्ष राकेश यादव, मार्केटिंग हेड सुमित चतुर्वेदी, उपमहाव्यवस्थापक सतीश देसरी, पुणे ‘सीओ’चे प्रमुख मधुकर रेड्डी आणि शाखा व्यवस्थापक ऋषिकेश जाधवर आदी उपस्थित होते.

माध्यमांशी बोलताना प्रमिला पी. यांनी सांगितले की, पुणे केंद्रामध्येही नारायणची संशोधनाधिष्ठित अध्यापन पद्धत, शिस्तबद्ध अभ्यासक्रम आणि सातत्यपूर्ण कामगिरी मूल्यांकन प्रणाली राबवली जाणार आहे. पुण्यातील विद्यार्थ्यांना आता देशातील टॉपर्स घडवणारी तीच संरचित शिक्षणपद्धती उपलब्ध होईल. महाराष्ट्रातील विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर सर्वोच्च क्रमांक मिळवू शकतील, असे पोषक शैक्षणिक वातावरण निर्माण उपलब्ध करून दिले जाणार आहे.”

जेईई अ‍ॅडव्हान्स्ड २०२५ मध्ये नारायणच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवत टॉप १० मधील पाच ऑल इंडिया ओपन कॅटेगरी क्रमांक (३, ४, ६, ७ आणि १०) पटकावले आहेत. यामध्ये पार्थ मंदार वर्तक (एआयआर ४) आणि साहिल देव (एआयआर ७) यांनी महाराष्ट्र टॉपरचा मान मिळवला असून, दोघांचेही प्रशिक्षण नारायणच्या मुंबई केंद्रात झाले आहे.

स्वारगेट येथील या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये जेईई व नीट परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधाही उपलब्ध आहेत. ४६ वर्षांची परंपरा असलेल्या नारायण ग्रुपकडे देशभरात ९००हून अधिक शैक्षणिक संस्था असून, ५० हजारांहून अधिक शिक्षक आणि सहा लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी या व्यवस्थेचा भाग आहेत, असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×