Breking News
घरफोडी करणाऱ्या सराईतांना अटक; ८ गुन्हे उघडकीसकुष्ठरोग निर्मूलन समन्वय बैठक संपन्नबालदिनानिमित्त दोन दिवशीय बालकुमार साहित्य संमेलनाचे रोजी आयोजननिवडणूक खर्चाच्याअनुषंगाने दर निश्चितीबाबत बैठक संपन्नजिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती कामकाजाबाबत बैठक संपन्ननगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका शांतेत, निर्भय आणि न्याय वातावरणात पाडण्याच्यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारीनगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारीएटीएस’कडून कोंढवा भागातील संशयितांची झाडाझडतीवारजे, खडकीत अपघातात दोघे ठारनाट्य निर्माते, नाट्य व्यवस्थापकांचा ‌‘रंगयात्री‌’ ॲपला विरोध

पुरग्रस्त बांधवांना मदत नाही तर कर्तव्य – रमेश बागवे

पूरग्रस्त भागांसाठी मातंग एकता आंदोलनाची दीपावली सणाच्या निमित्ताने ची जीवनावश्यक व उत्सवाची मदत मोहीम

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे अनेक कुटुंबे संकटात सापडली आहेत. या कठीण काळात मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेने पुढाकार घेत, पूरग्रस्त भागांतील नागरिकांसाठी दीपावली निमित जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचे कार्य गेल्या काही दिवसांपासून हाती घेतले आहे.यावेळी पूरग्रस्त बांधवांना मदत नाही तर आपले कर्तव्य असल्याची भावना यावेळी मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक व माजी मंत्री रमेश बागवे यांनी व्यक्त केली.

पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमीन विक्रीला जैन समाजाचा विरोध – सविस्तर बातमी

गेल्या आठवड्या पासून सुरू असलेल्या या मदत मोहिमेत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील अनेक पूरग्रस्त गावांमध्ये जाऊन अन्नधान्य व आवश्यक वस्तूंचे वाटप केले आहे.या उपक्रमात आतापर्यंत १३०० ते १४०० कुटुंबांना अन्नधान्य आणि आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले असून, काल या मोहिमेचा शेवटचा टप्पा दिनांक १५/१०/२०२५ रोजी धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुका, कपालापुरी, वडनेर, व इतर तसेच, सोलापूर चे रिदोरी, माढा तालुका, तांदुळवाडी, कुर्डवाडी, व इतर येथे एकूण १३०० कुटुंबियांना मदत कार्य पार पडले आहे. याअंतर्गत आजवर २,२०० ते २,५०० कुटुंबापर्यंत ही मदत पोहोचविण्याचे नियोजीत कार्य पूर्ण झाले आहे.

मातंग एकता आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा रमेशदादा बागवे यांच्या नेतृत्वाखाली हे कार्य अखंड सुरू होते, अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यात सक्रिय सहभाग नोंदविला आहे.

या उपक्रमात राज्य समन्वयक विठ्ठल थोरात, सचिव अरुणजी गायकवाड, सुनिल बावकर ,रामभाऊ वाघमारे जिल्हाध्यक्ष सोलापूर अनिल गवळी तालुका अध्यक्ष माढा जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब बागाव जिल्हा उपाध्यक्ष, धाराशिव जिल्हा अध्यक्ष रणजीत कसबे, राणा कसबे, सुनील कसबे, पंचायत समिती सदस्य गुलाब शिंदे, प्राध्यापक दुर्योधन साठे सर माजी उपसरपंच कालिदास शिरतोडे उपाध्यक्ष माढा तालुका ज्ञानेश्वर कसबे सुनिलजी बावकर यांनी व त्यांच्या टीम ने मोलाचे सहकार्य केले आहे.

या संपूर्ण मदत मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे, कुठलाही दिखावा किंवा प्रसिद्धीचा हेतू न ठेवता, संघटनेच्या कार्यकर्त्यांनी समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य पार पाडले. ‘मदत नव्हे, कर्तव्य’ ही संघटनेची भूमिका या मोहिमेत स्पष्टपणे जाणवली.

हे संपूर्ण अभियानाची संकल्पना संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष, व पुणे म न पा चे नगरसेवक श्री. अविनाश रमेशदादा बागवे यांची होती, व ती योग्य समन्वय साधून यशस्वीरित्या पूर्ण देखील केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×