२० ते २५ तोळे दागिने चोरले, भरदिवसा धायरीतील घटनेने खळबळ
Marathinews24.com
पुणे – सोने खरेदीच्या बहाण्याने ज्वेलर्समध्ये शिरून तिघाजणांनी नकली पिस्तूलाच्या धाकाने २० ते २५ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना मंगळवारी भरदुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास धायरीतील श्री ज्वेलर्स शॉपमध्ये घडली आहे. चोरट्यांनी ज्वेलर्स मालकालाही मारहाण केली असून, आरोपींच्या शोधार्थ पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार विष्णू सखाराम दहिवाल यांचे धायरीतील रायकर मळा परिसरात श्री ज्वेलर्स शॉप आहे. मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दहिवाल आणि त्यांच्या दुकानातील कामगार शॉपमध्ये होते. त्यावेळी चोरट्यांपैकी एकाने ज्वेलर्समध्ये शिरून सोन्रुाची चैन दाखवा, असे म्हणत दागिने खरेदीचा बहाणा केला. त्यानुसार दुकानमालक दहिवाल हे त्याला सोन्याची चैन दाखवत असताना, दोघा चोरट्यांनी शॉपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर तिघांनी मिळून ज्वेलर्स मालक दहिवाल यांना पिस्तुलचा धाक दाखवून धमकी दिली. शिवीगाळ करीत २५ ते ३० तोळे सोन्याचे वेगवेगळे दागिने ताब्यात घेतले.
पुण्यातील मराठी उद्योजकाची बिहारमध्ये हत्या – सविस्तर बातमी
दुकान मालक दहिवालने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, चोरट्यांनी त्यांना हाताने मारहाण केली. त्यानंतर पिस्टलच्या बटने मारहाण करून चोरटे दुचाकीवरून पसार झाले आहेत. सीसीटीव्ही फुटेजनुसार चोरट्यांचा माग काढला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान चोरट्यांपैकी एकजण ३५ वर्षाचा असून त्यांच्या अंगात लाल रंगाचे हाफ टी शर्ट, निळी जीन्स पॅन्ट आहे. दुसरा चोरटा अंदाजे २५ वयाचा असून, फुल काळा टी-शर्ट गोल गळ्याचा, डोक्यामध्ये काळया रंगाची टोपी, तोंडावर मास लावलेला, काळया रंगाची पॅन्ट असा वेश परिधान केला आहे. तर तिसर्या चोरट्याचे अंदाजे वय २५ असून, त्याने क्रीम रंगाचा फुल बायाचा गोल गळ्याचा टी-शर्ट, पांढर्या रंगाची जीन्स पॅन्ट, पांढरे शूज डोक्यामध्ये खाते रंगाची कॅप, पाठीवरती काळया रंगाची बॅग आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वारजे माळवाडी पोलिसांनी तातडीने धाव घेत तपासाला दिली. प्राथमिक तपासात चोरट्यांनी वापरलेले पिस्तूल नकली असल्याचे दिसून आले आहे.
चोरीच्या उद्देशाने शॉपमध्ये शिरलेल्या तिघांनी नकली पिस्तूलाच्या धाकाने दुकानमालकाला धमकावून लुट केली आहे. त्यांना मारहाण करीत चोरटे दुचाकीवरून पसार झाले आहे. आरोपींच्या शोधार्थ पोलीस मागावर आहेत. – – संभाजी कदम, पोलीस उपायुक्त, परिमंडळ तीन