Breking News
फ्लाईंग जिप्सी कॅफेला दणका, तोपर्यंत बंद ठेवणारपुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’हाफकिन संस्थेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री योगेश कदममहा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावेसिंहगड रस्ता भागात घरातून बेकायदा मद्य विक्री; आरोपीला अटकडाॅक्टरांकडे १० लाखांची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारांविरुद्ध गुन्हाजलसंधारण दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजनशीघ्र हस्तक्षेपण व शाळापूर्व तयारीसाठी क्रॉस डिसॅबिलिटी अभ्यासक्रम आराखड्याचे लोकार्पणपुणे जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : एक दृष्टीक्षेप…!!टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

कात्रजमध्ये अल्पवयीनावर शस्त्राने वार करून खून

कात्रजमध्ये अल्पवयीनावर शस्त्राने वार करून खून

बहिणीसोबत झालेल्या वादाचा राग मनात धरून टोळक्याचा हल्ला

marathinews24.com

पुणे – बहिणीशी वाद झाल्याच्या कारणावरून टोळक्याने एका अल्पवयीनावर शस्त्राने वार करून खून केल्याची घटना कात्रज भागात घडली. गणेश रवींद्र माळवे (वय १७, रा. कात्रज गाव) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत गणेश रामदास चव्हाण (वय २२, रा. गुजर वस्ती, कात्रज) याने फिर्याद दिली आहे.

‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत बेकायदा धंद्यांवर कारवाई – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश चव्हाण आणि गणेश माळवे हे मित्र आहेत. तीन महिन्यांपूर्वी माळवे याचा आरोपीच्या बहिणीशी वाद झाला होता. वादातून एका आराेपीने गणेशला जिवे मारण्याची धमकी दिली. गणेश याने कात्रज कट्टा परिसरात असलेल्या एका दुकानात मोबाइल दुरुस्तीसाठी दिला होता. सोमवारी (२० जुलै) रात्री दहाच्या सुमारास माळवे आणि चव्हाण हे मोबाइल दुकानात निघाले होते. दुरुस्त केलेला मोबाइल त्याने दुकानातून घेतला. त्या वेळी दुचाकीवरून आरोपी तेथे आले. आरोपींकडे तीक्ष्ण शस्त्रे होती. आरोपींना पाहताच माळवे हा तेथून पळाला. आरोपींनी पाठलाग करून माळवे याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. रक्ताच्या थारोळ्यात माळवे पडला. त्यानंतर या घटनेची माहिती त्याचा मित्र चव्हाण याने माळवेच्या भावाला दिली.

माळवेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली. सहायक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×