घरफोडी करणाऱ्या आंतराज्‍यीय टोळीच्‍या म्‍होरक्‍याला बेड्या

गुंड सुरज ठोंबरे टोळीतील सराईत अटकेत, पिस्तूल जप्त

४८ लाखांच्या सोन्या-चांदीचा ऐवज जप्‍त

marathinews24.com

पुणे – व्यापाऱ्याच्‍या घरातून ६८ लाखांचा ऐवज चोरी करणाऱ्या आंतराज्‍यीय टोळीच्‍या म्होरक्‍याला स्‍थानिक गुन्‍हे शाखा आणि खेड पोलिसांनी आरोपींचा बेड्या ठोकल्‍या आहेत. त्‍याच्‍याकडून चोरी गेलेल्‍या पैकी ५५ तोळे सोन्याचे दागिने, ८३० ग्रॅम चांदी, गुन्‍ह्यातील कार असा ४७ लाख ८१ हजारांचा ऐवज जप्‍त केला आहे. रिझवान निजामुद्दीन शेख (वय ४२ रा. सरकरपूर थाना, स्‍कुल, ब्लॉक दिल्‍ली मुळ रा. फिरोजपुर, बिजनौर, उत्‍तरप्रदेश) असे अटक केलेल्‍याचे नाव आहे. खेड येथील व्यापारी मोतीलाल कांतीलाल गदीया (रा. श्री अपार्टमेंट, पाबळरोड, होलेवाडी, राजगुरूनगर) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

अमृता फडणवीस यांच्या संदर्भातील आक्षेपार्ह विधान; अंजली भारतींविरोधात पोलिसांत तक्रार – सविस्तर बातमी 

खेड शहरात भरवस्‍तीमध्ये चोरीचा गुन्हा घडला होता. मोठ्या प्रमाणावर ऐवज चोरीला गेल्याने स्‍थानिक गुन्‍हे शाखेसह खेड पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटिव्‍ही फुटेजवरून आरोपी हे पांढऱ्या रंगाच्‍या कारमध्ये नाशिकच्‍या बाजुने जाताना दिसून आले. यासाठी तब्‍बल १२० किलोमिटरपर्यंत सीसीटिव्‍ही धुंडाळण्यात आले. पथकातील अमंलदार दिपक साबळे, संदीप वार, अक्षय नवले यांना माहिती मिळाली की, आंतरराज्‍यीय टोळीतील सराईत गुन्‍हेगार रिझवान शेख हा त्‍याच्‍या साथीदाराच्‍या मदतीने गुन्हा केल्‍याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याला पकडण्यात आले. ही कामगिरी पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्‍ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे स्‍थानिक गुन्‍हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुभाष चव्‍हाण यांच्‍या पथकाने केली.

संबंधित सराईत टोळी कारचा वापर करून बंद घरे फोडून चोरी करून पुन्‍हा उत्‍तर भारतात निघून जात असल्‍याचे तपासात निष्पन्न झाले आहे. रिझवान शेख याचा स्‍थानिक गुन्‍हे शाखेच्‍या पथकाने दिल्‍ली व उत्‍तर प्रदेशात जावून सलग ६ दिवस आरोपीचा शोध घेतला. आरोपी सराईत असल्‍याने तो वेळोवेळी ठावठिकाणा बदलून राहत होता. त्‍यामुळे तो मिळून येण्यासाठी पथकाला खूप मेहनत घ्यावी लागली. आरोपी रिझवान शेख हा गुजारातवरून मुंबईकडे जात असलयाची माहिती मिळाली. त्‍यानंतर तो पुण्यात आल्‍यानंतर त्‍याला पुणे-नाशिक महामार्गावरून ताब्यात घेत अटक करण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×