Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

अमृता फडणवीस यांच्या संदर्भातील आक्षेपार्ह विधान; अंजली भारतींविरोधात पोलिसांत तक्रार

घरफोडी करणाऱ्या आंतराज्‍यीय टोळीच्‍या म्‍होरक्‍याला बेड्या - ४८ लाखांच्या सोन्या-चांदीचा ऐवज जप्‍त पुणे- व्यापाऱ्याच्‍या घरातून ६८ लाखांचा ऐवज चोरी करणाऱ्या आंतराज्‍यीय टोळीच्‍या म्होरक्‍याला स्‍थानिक गुन्‍हे शाखा आणि खेड पोलिसांनी आरोपींचा बेड्या ठोकल्‍या आहेत. त्‍याच्‍याकडून चोरी गेलेल्‍या पैकी ५५ तोळे सोन्याचे दागिने, ८३० ग्रॅम चांदी, गुन्‍ह्यातील कार असा ४७ लाख ८१ हजारांचा ऐवज जप्‍त केला आहे. रिझवान निजामुद्दीन शेख (वय ४२ रा. सरकरपूर थाना, स्‍कुल, ब्लॉक दिल्‍ली मुळ रा. फिरोजपुर, बिजनौर, उत्‍तरप्रदेश) असे अटक केलेल्‍याचे नाव आहे. खेड येथील व्यापारी मोतीलाल कांतीलाल गदीया (रा. श्री अपार्टमेंट, पाबळरोड, होलेवाडी, राजगुरूनगर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. खेड शहरात भरवस्‍तीमध्ये चोरीचा गुन्हा घडला होता. मोठ्या प्रमाणावर ऐवज चोरीला गेल्याने स्‍थानिक गुन्‍हे शाखेसह खेड पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटिव्‍ही फुटेजवरून आरोपी हे पांढऱ्या रंगाच्‍या कारमध्ये नाशिकच्‍या बाजुने जाताना दिसून आले. यासाठी तब्‍बल १२० किलोमिटरपर्यंत सीसीटिव्‍ही धुंडाळण्यात आले. पथकातील अमंलदार दिपक साबळे, संदीप वार, अक्षय नवले यांना माहिती मिळाली की, आंतरराज्‍यीय टोळीतील सराईत गुन्‍हेगार रिझवान शेख हा त्‍याच्‍या साथीदाराच्‍या मदतीने गुन्हा केल्‍याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याला पकडण्यात आले. ही कामगिरी पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्‍ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे स्‍थानिक गुन्‍हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुभाष चव्‍हाण यांच्‍या पथकाने केली. संबंधित सराईत टोळी कारचा वापर करून बंद घरे फोडून चोरी करून पुन्‍हा उत्‍तर भारतात निघून जात असल्‍याचे तपासात निष्पन्न झाले आहे. रिझवान शेख याचा स्‍थानिक गुन्‍हे शाखेच्‍या पथकाने दिल्‍ली व उत्‍तर प्रदेशात जावून सलग ६ दिवस आरोपीचा शोध घेतला. आरोपी सराईत असल्‍याने तो वेळोवेळी ठावठिकाणा बदलून राहत होता. त्‍यामुळे तो मिळून येण्यासाठी पथकाला खूप मेहनत घ्यावी लागली. आरोपी रिझवान शेख हा गुजारातवरून मुंबईकडे जात असलयाची माहिती मिळाली. त्‍यानंतर तो पुण्यात आल्‍यानंतर त्‍याला पुणे-नाशिक महामार्गावरून ताब्यात घेत अटक करण्यात आली.

लष्कर-ए-भीमा संघटनेचे संस्थापक सचिन धिवार यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

marathinews24.com

पुणे – सोशल मीडियावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी तथा सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांच्या संदर्भात अत्यंत घृणास्पद, हिंसाचारास प्रवृत्त करणारी व महिलांच्या सन्मानाला धक्का देणारी विधाने केल्याप्रकरणी अंजली भारती यांच्याविरोधात पुणे पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते व लष्कर-ए-भीमा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिवाजीराव धिवार यांनी ही तक्रार पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेऊन निवेदन दिले. पोलीस आयुक्तांनी याची दखल घेत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

बीड पंचायत समितीमध्ये राडा; बाजार समितीचे संचालक गुंदेकर जीवघेणा हल्ला – सविस्तर बातमी 

तक्रारीनुसार, २७ जानेवारी रोजी युट्यूब, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित झालेल्या एका व्हिडिओमध्ये अंजली भारती यांनी बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याचा उल्लेख करत अमृता फडणवीस यांच्या संदर्भात अत्यंत आक्षेपार्ह, स्त्रीद्वेषी आणि हिंसाचारास प्रोत्साहन देणारी विधाने केली. ही विधाने कोणत्याही प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेत येत नसून ती थेट लैंगिक हिंसाचाराचे समर्थन व प्रोत्साहन देणारी असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

सचिन धिवार म्हणाले, “अशा प्रकारची विधाने महिलांच्या सन्मान, प्रतिष्ठा व सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण करणारी असून समाजात द्वेष, भीती व अस्थिरता पसरवणारी आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर ही विधाने प्रसारित झाल्याने अनेक महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

अंजली भारती यांच्या विधानांमुळे सार्वजनिक नैतिकता, सामाजिक शांतता आणि स्त्री-सन्मान यांचा भंग झाल्याचा दावा करत त्यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता, भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. संबंधित व्हिडिओचा दुवा तक्रारीसोबत जोडण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कठोर कायदेशीर कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात महिलांविरोधात व हिंसाचारास प्रवृत्त करणारी विधाने करणाऱ्यांना आळा बसेल, अशी मागणी सचिन धिवार यांनी केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×