Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

बीड पंचायत समितीमध्ये राडा

बीड पंचायत समितीमध्ये राडा

बाजार समितीचे संचालक गुंदेकर जीवघेणा हल्ला

marathinews24.com

बीड  (अनंत जाधव) – आमच्या गावात का येतो, गावातल्या लोकांचे प्रश्न का सोडवतो असे म्हणत बीड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धनंजय गुंदेकर यांना बीडच्या पंचायत समिती कार्यालयात मौज गावच्या सरपंचाने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या मारहाणीमुळे खळबळ उडाली असून मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी संबंधिताविरोधात तक्रार देण्यासाठी गुंदेकर यांनी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आहे. दिवसाढवळ्या लोकांना मारहाण होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

कुख्यात नीलेश घायवळ टोळीला पिस्तूल परवाना मिळवून देणारा अटकेत – सविस्तर बातमी 

बीड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धनंजय गुंदेकर हे मंगळवारी (दि.२७) सकाळी पंचायत समिती कार्यालयात गेले होते. त्याठिकाणी मौज गावचे सरपंच संदीप डावकर हेही उपस्थित होते. काही कारणामुळे डावकर आणि गंदेकर यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. वादातून डावकर याने गुंदेकर यांना मारहाण केली. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
आमच्या गावात येवून लोकांच्या समस्या का सोडविता असे म्हणत डावकर यांनी गुंदेकर यांना मारहाण केली असल्याचे गुंदेकर यांनी म्हंटले आहे.

सिनेस्टाईल पध्दतीने मारहाणीच्या घटना जिल्ह्यामध्ये वाढल्या आहेत. अशा या वाढत्या घटना पाहता कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. कायद्याचा धाक राहिला आहे की नाही असे प्रश्न नागरिकांध्ये उपस्थित होत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×