कुख्यात नीलेश घायवळ टोळीला पिस्तूल परवाना मिळवून देणारा अटकेत

बीड पंचायत समितीमध्ये राडा

लोणावळ्यात केला होता हवेत गोळीबार

marathinews24.com

पुणे – मैत्रीणीशी वादविवाद झाल्यानंतर परवाना असलेल्या पिस्तूलातून हवेत झाडण्यात आलेल्या त्या गोळीबाराने नवीन वळण घेतले आहे. पिस्तूल परवाना घेताना पुणे पोलिसांची दिशाभूल करून त्याचा परवाना घेण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ५ गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगाराने हे पिस्तूल बनावट पत्ता तसेच नावात बदल करून घेतल्याची माहिती उघडकीस आली आहे. कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीतील गुंडाला पिस्तूल मिळवून देणारा ‘तोच’ एजंट या देखील प्रक्रियेत सहभागी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

छळाला कंटाळून सुनेची आत्महत्या – सविस्तर बातमी

राहूल तारू (रा. सहकारनगर) असे गोळीबार करणाऱ्याचे नाव आहे. त्याने खोटी माहिती देऊन पिस्तूल परवाना घेतला आहे. याप्रकरणी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिस अधीक्षक संदिप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपी राहूल तारू हागेल्या आठवड्यात (दि. २२) त्याच्या मैत्रिणीसोबत पौड परिसरात गेला होता. तेथून ते लोणावळा येथे गेले. मध्यरात्री एकच्या सुमारास मॅप्रोगार्डन परिसरात दोघांचे वादविवाद झाले. त्यातून रागाच्या भरात राहूल तारू याने पिस्तूलातून हवेत दोनवेळा गोळी झाडली. गोळीबाराची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. येथील सीसीटीव्ही तपासले असता त्यात हा प्रकार कैद झाल्याचे निदर्शनास आले. लोणावळा पोलिसांनी राहूल तारूला ताब्यात घेतले. त्याच्याकडे परवाना असलेले पिस्तूल होते. हे पिस्तूल पुणे पोलिसांकडून देण्यात आल्याचेही समजले. पुणे ग्रामीण पोलिसांनी गोळीबार प्रकरणाचा गुन्हा नोंद करून तपास सुरू केला असता त्याने नावात बदल करून हे पिस्तूल घेतल्याचे समोर आले. पुणे ग्रामीण पोलिसांकडून या पिस्तूल परवाना संदंर्भाने पुणे पोलिसांना एक अहवाल सादर करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

नावात अन् पत्ता बदलून मिळवला परवाना

राहूल तारू हा सहकारनगर परिसरात राहण्यास आहे. त्याच्यावर बंडगार्डन, सहकारनगर अशा पोलिस ठाण्यात २००६, २००७ आणि २०१८ मधील एकूण ५ गुन्हे दाखल आहेत. तरीही त्याला पिस्तूल परवाना कसा मिळाला, याचा शोध घेण्यात आला. तेव्हा राहूलने राहण्याचा पत्ता लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दिला. तर राहूलच्या ऐवजी भूषण तारू असे नाव बदलून हा पिस्तूल परवाना मिळविल्याचे दिसून आले आहे.

राहूल तारू हा पेशाने रोड काँट्रॅक्टर आहे. त्याने हे पिस्तूल एका एजंटमार्फत मिळविल्याचे समोर आले आहे. त्यासाठी मोठी रक्कम देखील दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्या एजंटवर नुकताच येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा देखील नोंद झाला असून, याच एजंटमार्फत कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीतील गुंड अजय महादेव सरोदे याने देखील अशाच खोटा पत्ता व नावात बदलून पिस्तूल घेतल्याचे प्रकरण समोर आले होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×