Breking News
मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवातमोशी इमारत दुर्घटना: प्राथमिक पाहणीनुसार संतृप्त घनकचऱ्याच्या आडव्या दाबामुळे इमारत उलटल्याचा अंदाज‘पुनीत बालन ग्रुप’कडून आषाढी वारीतील पोलिसांना ९ हजार जीवनावश्यक वस्तूंचे किटपुण्यातून पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त मध्यरात्रीनंतर वाहतूकीत बदलपुण्यात डाॅक्टरांकडे ५० हजारांची खंडणीची मागणीविवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर‘विठू माऊली’ कार्यक्रमातून दुमदुमणार हरिनामाचा गजरपुण्यातील त्या कर्तव्यदक्ष उपनिरीक्षकाचे निलंबन मागेमोशी कचरा डेपो दुर्घटना : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी साधला संवाद

तुळापूरातील पार्टीत पुण्यातील पबमधील मद्यसाठा

आधी मोबाइल हिसकावला, मग बँकखाते केले रिकामे

पबविरुद्ध कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव

marathinews24.com

पुणे – तुळापुरातील ‘प्रोजेक्ट एक्स’ पार्टीत राजा बहाद्दुर मिल परिसरातील पबमधून मद्यसाठा पुरविण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. मद्याची विक्रीचा परवाना पबमधील जागेपुरता मर्यादित असताना अन्य ठिकाणी तो पाठविण्यात आला. या प्रकरणात संबंधित पबविरुद्ध कारवाई करण्याचा प्रस्ताव राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे.

विनापरवाना लाकूड वाहतूक करणारा टेम्पो जप्त-वनपरिक्षेत्र अधिकारी अश्विनी शिंदे – सविस्तर बातमी 

तुळापुरातील बंगल्यात आयोजित करण्यात आलेल्या पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकला. या पार्टीला रात्री साडेअकरापर्यंत परवानगी होती. मात्र ही पार्टी पहाटेपर्यंत सुरू होती. या पार्टीतून पोलिसांनी मद्यसाठा, तीन ग्रॅम गांजा, तसेच अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी पार्टीच्या आयोजकांसह ७८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या पार्टीच्या आयोजनाता राजा बहाद्दुर मिल परिसरातील पब मालकाचा सहभाग असल्याचे उघडकीस आले होते. तपासात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यसाठ्याबाबत चौकशी केली. मद्य वितरण नोंदीची माहिती घेतल्यानंतर संबंधित मद्यसाठा विक्रीची परवानगी पबला देण्यात आली होती. पबमधील मद्यसाठा टेम्पोतून तुळापुरातील पार्टीच्या ठिकाणी नेण्यात आल्याचे उघडकीस आले होते.

परवान्यातील अटींचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून संबंधित पबविरुद्ध कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडे पाठविला आहे. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे म्हणाले, ‘संबंधित पबला मद्य विक्री, वितरणाची परवानगी संबंधित जागेपुरती दिली होती. मात्र, पबमधील मद्यसाठा अन्य ठिकाणी नेण्यात आला. नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.’

जिल्हाधिकारी कार्यालयाने या प्रस्तावानुसार कारवाई केल्यास ती दंडात्मक स्वरुपात केली जाऊ शकते. परवाना निलंबन किंवा परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाऊ शकते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×