Breking News
Crime News : धक्का लागल्याच्या वादातून टोळक्याकडून एकाचा खूनCrime News : बालेवाडीत महिलेचे दागिने हिसकावलेबाणेर-बालेवाडी वाहतूक समस्यांबाबत उच्चस्तरीय बैठक : तातडीने उपाययोजनांचे आदेशकोथरुड मध्ये वाहतूक नियंत्रणासाठी ५० वॅार्डनची नियुक्ती करा! नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देशपिंपरीत ‘अवकारीका’ चित्रपटाच्या टीमने पथनाट्य सादर करत केली स्वच्छता विषयक जनजागृतीलाखो वारकऱ्यांपर्यंत पोहचली मदत व पुनर्वसन विभागाची वारीरुद्रांग वाद्यपथक ट्रस्टचा वाद्यपूजन सराव शुभारंभ सोहळा उत्साहातपीएमपील बसमध्ये चोऱ्या करणाऱ्या अट्टल चोरट्याला अटकउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शहरातील विविध विकासकामांची पाहणीकीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंगमध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी

लिव्ह इनमध्ये राहणार्‍या प्रियेसीचा गळा घोटला

छळाला कंटाळून महिलेने इमारतीवरून उडी मारून केली आत्महत्या

खून केल्यानंतर आरोपी यवत पोलीस ठाण्यात झाला हजर

marathinews24.com

पुणे – मामाच्या मुलीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहताना तिचे इतरांसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशय प्रियकराला आला. त्याच रागातून प्रियकराने प्रियेसीचा गळा दाबून खून केल्याची घटना हडपसरमधील शेवाळेवाडीत घडली आहे. त्यानंतर आरोपी स्वतःहून यवत पोलीस ठाण्यात हजर झाला. अनिता ऊर्फ कमल विक्रम लोंढे (वय २८ रा. भंडलकर नगरच्या पाठीमागे शेवाळेवाडी फाटा मांजरी ) असे खून केलेल्या तरूणीचे नाव आहे. याप्रकरणी राहूल शिवाजी मिसाळ (वय ३२ रा. यवत, मूळ-माळशिरस, सोलापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

ट्रक चालकाला धमकावून १० हजारांची केली वाटमारी; सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील अंमलदार निलंबित – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवाळेवाडी परिसरातील भंडलकरनगर परिसरात तरूणीचा गळा दाबून खून केल्याची माहिती शुक्रवारी दि. २३ सकाळी सातच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानुसार हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक, निलेश जगदाळे, तपासपथक अधिकारी सत्यवान गेंड यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून पोलिसांनी तरूणीची ओळख पटविली. अनिता उर्फ कमल लोंढे असे तिचे नाव असून, मागील दोन वर्षांपासून ती नात्यातील मुलगा राहूल मिसाळ याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, खून केल्यानंतर आरोपी राहूल हा यवत पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाल्याची माहिती पथकाला मिळाली.

हडपसर तपास पथकाने संबंधित आरोपीला यवत पोलिसांकडून ताब्या घेत चौकशी केली. त्यावेळी त्याने अनिता ही त्याच्या मामाची मुलगी असून दोघेजण सुमारे २ वर्षापासून यवतमध्ये एकत्र राहत असल्याचे सांगितले. त्यानंतर १८ मे २०२५ रोजी ते शेवाळवाडीत राहण्यास आले होते. दरम्यानच्या काळात अनिताचे आणखी कोणाबरोबर तरी अनैतीक संबध असल्याचा संशय आरोपी राहूलला होता.त्याच रागातून चिडून त्याने अनिताचा गळा दाबून खुन केल्याची कबुली दिली.

याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्ता स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे,सत्यवान गेंड, अनिल बिनवडे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top