Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

खेलो इंडिया बीच कबड्डीत महाराष्ट्राची धडाकेबाज सलामी

खेलो इंडिया बीच कबड्डीत महाराष्ट्राची धडाकेबाज सलामी

यजमान दीव संघाचा ५३ गुणांनी धुव्वा; महाराष्ट्र अव्‍वल स्‍थानासाठी झुंजणार – पथकप्रमुख नवनाथ फरताडे

marathinews24.com

दीव – दुसऱ्या पर्वातील खेलो इंडिया बीच स्‍पर्धेचा उद्‌घाटनाचा दिवस महाराष्ट्राच्‍या कबड्डी संघाच्‍या धडाकेबाज कामगिरीने गाजला. महिलांनी सलामीच्‍या लढतीत यजमान दीव-दमण संघाचा ५३ गुणांनी धु्व्वा उडविला. पाठोपाठ पुरूष संघानेही बलाढ्य दिल्‍लीला ४७ -२० गुणांनी पराभूत करीत विजयी सलामी दिली.

जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडून ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ मार्गाची पाहणी – सविस्तर बातमी 

दीवमधील निसर्गसंपन्‍न घोघला समुद्र किनाऱ्यावर खेलो इंडिया बीच स्‍पर्धेचे आज शानदार उद्‌घाटन झाले. स्‍पर्धेत महाराष्ट्राचे ७७ जणांचे पथक सहभागी झाले आहे. या्मध्ये ३१ पुरूष¨व २८ महिला खेळाडूंचा समावेश होता. स्‍पर्धेत बीच सॉकर, बीच कबड्डी, बीच पेंचक सिलट, सागरी जलतरण, बीच सपक टकरा प्रकारात महाराष्ट्र झुंजणार आहे. स्‍पर्धेत भारतातील ३१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी भाग घेतला आहे.

गतस्‍पर्धेत पदकतक्‍यात ५ सुवर्ण, ५ रौप्‍य, १० कांस्य एकूण २० पदके जिंकून महाराष्ट्राने उपविजेतेपद पटाकवले होते. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने पालघर क्रीडा अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने केळवे बीच येथे सराव शिबिर आयोजित केले होते. कसून सराव करून महाराष्ट्र स्‍पर्धेत खेळणार असून आपले खेळाडू पदकासाठी सज्‍ज झाले आहेत. यंदा महाराष्ट्र अव्‍वल स्‍थानासाठी झुंजताना दिसेल असे पथकप्रमुख नवनाथ फरताडे यांनी सांगितले आहे

दुसऱ्या स्‍पर्धेतील सकाळच्‍या सत्रात सत्रात संपलेल्‍या बीच कबड्डीत स्‍पर्धेतीत सलामीच्‍या लढतीत महाराष्ट्राच्‍या महिला संघाने यजमान दीव-दमण संघावर ७१-१८ गुणांनी दणदणीत विजय संपादन केला. सुरूवातीपासून महाराष्ट्राच्‍या महिलांनी आक्रमक खेळ करीत आपले वर्चस्‍व गाजवले. पूर्वार्धातील ३६-५ गुणांनी आघाडी कायम राखत होती. समृद्धी मोहिते व हर्षा शेट्टी यांनी उत्कृष्ट चढाया करीत तर पौर्णिमा जेधे, समरीन बुरोंडकर यांनी पकड घेत स्‍पर्धेत सर्वात मोठ्या विजयाची पल्‍ला सर केला.

पुरूषांच्‍या कबड्डीतही जय महाराष्ट्राचा नारा घुमला. महाराष्ट्राने दिल्‍लीवर ४७-२० गुणांनी दणदणीत विजयाची नोंद केली. पूर्वार्धात २३-१४ गुणांनी मोठी आघाडी महाराष्ट्राने घेतली होती. उत्तरार्धातही साहिल राणेने आक्रमक आणि दादासो पुजारचीच्‍या पकडीमुळे महाराष्ट्राने २७ गुणांनी पहिल्‍याच लढतीत विजयाचा झेंडा फडकविला आहे.

गतस्‍पर्धेत महाराष्ट्राने पेंचक सिलटमध्ये महाराष्ट्राने ३ सुवर्ण, ४ रौप्‍य व ५ कांस्य अशी एकूण १२ पदकांची कमाई करीत वर्चस्‍व गाजवले. होते. सागरी जलतरणातही २ सुवर्ण, १ रौप्‍य व २ कांस्य पदके महाराष्ट्राच्‍या नावापुढे झळकवली होती. बीच सॉकर, बीच कबड्डी या सांघिक खेळातही कांस्यपदकावर महाराष्ट्राच्‍या खेळाडूंनी नाव कोरले. होते यंदा अव्‍वल स्‍थानासाठी मणिपूर, नागालँड व महाराष्ट्रात चुरस पहाण्यास मिळणार आहे. कबड्डीतील पहिल्‍या सुवर्णपदकासाठी महाराषट्राने विजयी वाटचाल सुरू केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×