महिला अत्याचारा विरोधात समाजवादी पार्टीचा आक्रोश
marathinews24.com
पुणे – गुन्हेगारांना क्लीनचिट देणे हाच सध्याचा गृहखात्याचा व्यवसाय बनला असून. पंधराशे रुपये देऊन आमच्या साध्या-भाबड्या बहिणींना तुमची कटपुतली समजता का ? असा प्रश्न उभा करत, महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेली गुन्हेगारी, महिलांवर होणारे अत्याचार, गुंड्याची दहशत, जंग लागत चाललेली पोलीस यंत्रणा व अनाथ झालेली कायद्या सुव्यवस्था सक्षम होण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या दोन महत्वाच्या पदांना न्याय देऊ शकत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र राज्याला स्वतंत्र आणि पूर्णवेळ काम करणारे गृहमंत्री मिळावे अशी लोकहिताची मागणी समाजवादी पार्टी पुणे शहराच्या वतीने करण्यात आली.
क्रीडा विभागाकडून प्रोजेक्ट महादेवा अंतर्गत निवडचाचणी 31 ऑक्टोबरला पुण्यात – सविस्तर बातमी
फलटण येथील महिला डॉक्टरला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी सोमवारी समाजवादी पार्टी, पुणे शहर तर्फे फर्ग्युसन रस्त्या, कलाकार कट्टा, गुडलक चौकात तीव्र आक्रोश, निदर्शने करत आंदोलन करण्यात आले. या आंदोलना प्रसंगी जांबुवंत मनोहर (अध्यक्ष पुणे शहर), अनिस अहमद (सरचिटणीस, म.प्र), साधनाताई शिंदे (पुणे जिल्हा, महिला जिल्हाध्यक्षा), दत्ता पाकिरे (सरचिटणीस, पुणे शहर) विनायक लांबे (कार्यकारिणी सदस्य म.प्र ), अशोकराव गायकवाड (कार्यकारिणी सदस्य, म.प्र), अनिरुद्ध सुर्यवंशी (उपाध्यक्ष, पुणे शहर), शहाजहान झारी (सचिव,पुणे शहर), जावेद शेख (अध्यक्ष: छत्रपती शिवाजी महाराज नगर मतदारसंघ), प्रकाश डोंबाळे (संघटक,पुणे शहर), इब्राहिम यवतमाळवाले (सदस्य पुणे शहर), अजिम शेख (कार्याध्यक्ष, छत्रपती शिवाजी महाराज नगर मतदारसंघ), सदस्य भारत मालुसरे, सलिम बडगेर, विष्णू गरुड, दीपक पाटील यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
स्व. डॉ. संपदा मुंडे हिची समाज माध्यमांच्या माध्यमातून होणारी बदनामी थांबवावी. तसेच मुख्यमंत्री, गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या, शासनकर्ता वर्गाच्या लक्ष वेधून घेण्यासाठी आणि आरोपींना कडक शिक्षा व्हावी यासाठी विशेष सरकारी वकील नेमून तो खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा. या प्रकरणातील दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई व्हावी; अशी मागणी देखील समाजवादी पार्टी पुणे शहराचे अध्यक्ष जांबुवंत मनोहर यांनी व्यक्त केली.





















