१५ वर्षीय मुलगा ठार, पाच जण जखमी
marathinews24.com
पुणे – शहराजवळ असलेल्या उंड्रीतील जगदंब भवन मार्गावरील मार्वल आयडियल सोसायटीच्या १४ मजली इमारतीत बाराव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामुळे घरात आग लागून १५ वर्षीय मुलगा ठार झाला असून, ५ जण जखमी झाले आहेत. ही आग शुक्रवारी ( दि. २६) दुपारच्या सुमारास घडली आहे.
घनश्याम हाके यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल – सविस्तर बातमी
पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून पाच अग्निशमन वाहने, शिडीचे वाहन तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी होज पाईपद्वारे आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात अग्निशमन दलाचे दोन जवान व तीन नागरिक जखमी झाले असून, दुर्दैवाने १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. सध्या आग नियंत्रणात असून कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. घटनेमुळे परिसरात मोठी धावपळ उडाली होती. पोलिस व अग्निशमन दलाचे पथक परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.



















