द्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते दिले निवडीचे पत्र
marathinews24.com
पुणे – शहरातील आंबेडकरी चळवळीचे नेत मिलिंद अहिरे यांची शिवसेना पुणे शहराच्या मागासवर्गीय प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची निवड केली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार निवड केल्याचे पत्रात नमूद केले आहे. मागासवर्गीय प्रमुख पदी नियुक्ती करण्यात येत आहे. त्यांना निवडीचे पत्र शिवसेना नेते व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते नुकतेच देण्यात आले. यावेळी सह संपर्क प्रमुख अजय भोसले, महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर, शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे उपस्थित होते.
कॅनव्हासवर उमटली देवी अहिल्यांची शिवभक्ती; १०० वर्षांपूर्वीच्या महाकुंभाचे वैभव – सविस्तर बातमी
नियुक्ती कालावधी हा एक वर्षाचा असणार आहे . बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा आपण प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. अहिरे यांच्या निवडीने पुणे शहरातील झोपडपट्ट्या आणि मागासवर्गीय समाजामध्ये शिवसेना वाढीचा संकल्प पक्षाने केला असल्याचे दिसून येत आहे .



















