चंद्रकांत पाटील यांनी अपघातग्रस्तांच्या मदतीला धाव घेतली
marathinews24.com
पुणे – पीएमपीएल बसचा ब्रेक नादुरुस्त झाल्यामुळे ६ वाहनांना धडक बसून ३ जण जखमी झाले होते. हा अपघात मंगळवारी संध्याकाळी चारच्या सुमारास चांदणी चौकात झाला होता. अपघातात जखमी झालेल्या नागरिकांच्या उपचाराचा सर्व खर्च कोथरूडचे आमदार आणि उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उचलला आहे. त्यांच्या सामाजिक दातृत्वाचे नागरिकांनी कौतुक केले आहे.
बाल विवाह रोखण्यासाठी प्रयत्न करावे- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी – सविस्तर बातमी
कोथरुडमधील भुसारी कॉलनी जवळ पीएमपीच्या बसचे ब्रेक फेल होऊन मोठा अपघात झाला. या अपघातात तीन जण जखमी झाले असून; यांच्यावर उपचारासाठी उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री व कोथरुडचे आमदार चंद्रकांत दादा पाटील सरसावले आहेत. जखमींना सह्याद्री रुग्णालयात दाखल करुन त्यांचा उपचाराचा सर्व खर्च ते करणार असल्याचे सांगितले आहे. मंगळवारी संध्याकाळी कोथरुड डेपोकडे येणाऱ्या बसचे ब्रेक फेल झाल्याने मोठा अपघात झाला.
अपघातात चार ते पाच वाहनांचे नुकसान झाले, तर तीन जण जखमी झाले. जखमींना जवळच्या सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री, कोथरुडचे आमदार चंद्रकांत दादा पाटील यांना अपघाताची माहिती समजली. त्यांनी जखमींवर चांगले उपचार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, सर्व उपचाराचा खर्च उचलून कुटुंबियांना धीर दिला. पाटील यांच्या संवेदनशीलतेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.