Breking News
शिरुर, मावळ मधील युवा सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याकायद्याच्या रक्षकानेच जमिनीच्या वादामध्ये दाखवली बंदूकगावठी कट्टयासह जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या आरोपींना बेड्याअनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिवराज्यभिषेक दिन साजराक्रेडाईकडून पारदर्शक व पथदर्शी काम व्हावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउसण्या पैशांच्या वादातून महिलेचा गळा आवळून खूनखरीप हंगामात युरियासोबतच अन्य खताचा वापर कराAjit Pawar : शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा स्मरण करून सर्वांनी पुढे गेले पाहिजे-उपमुख्यमंत्री अजित पवारदुचाकीच्या डिक्कीतून ऐवजाची केली चोरीटेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरूण ठार

दहशत माजवणार्‍या आकाश थोरात टोळीवर मोक्का

दहशत माजवणार्‍या आकाश थोरात टोळीवर मोक्का

पूर्ववैमनस्यातून तरुणाचा केला होता खुन, ११ जणांवर कारवाई

marathinews24.com

पुणे– पूर्ववैमनस्यातून तरुणावर वार करुन त्याचा खुन करणार्‍या व आंबेगाव परिसरात दहशत माजविणार्‍या आकाश थोरात टोळीवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाई केली आहे. टोळीप्रमुख आकाश भरत थोरात (३२, रा. अटल चाळ, आंबेगाव खुर्द), अजित अंकुश धनावडे (वय २४) आदित्य जालिंदर शिंदे (वय १८) रोहित बाळासाहेब कचरे (वय २१) विशाल ऊर्फ।गोड्या दीपक गणेचारी (वय २१) यांच्यासह ६ अल्पवयीन मुलांविरुद्ध मोक्का कारवाई केली आहे. टोळीतील अजित धनावडे हा फरार आहे.यश खंडु कांबळे (२३, रा. कात्रज) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कोंढव्यात घरफोडी, १० लाख ७५ हजारांचा ऐवज चोरीला – सविस्तर बातमी 

कांबळेचे मित्र आदित्य काकडे व साहिल काकडे, सार्थक ऊर्फ ओम नितीन पंडित (१९, रा. अटल चाळ, कात्रज) यांचा ग्रुपआहे. एक वर्षापूर्वी काकडेच्या पानटपरीवर आदित्य शिंदे हा।गेला होता. त्यावेळी त्यांच्यामध्ये झालेल्या भांडणातून आदित्य व साहिल काकडे यांनी आदित्यला मारहाण केली होती. त्यानंतर यश कांबळे व सार्थक पंडित हे ५ एप्रिल २०२५ रोजी रात्री साडेदहा वाजता दुचाकीवरुन जात होते. त्यावेळी आकाश थोरात यांच्या साथीदारांनी दुचाकी अडवून ‘‘तुम्हाला लय मस्ती आली का, तुमचे मित्र आदित्य काकडे, साहिल काकडे यांनी आमचे मित्र आदित्य।शिंदे याला मारहाण केली आहे.

आम्हाला आमच्या भाईंनी बघुन घ्यायला।सांगितले आहे. आम्ही तुम्हाला जीवंत सोडत नसतो,’’ असे म्हणून काही।अल्पवयीन मुलांनी धारदार शस्त्राने कांबळे व सार्थक पंडित यांच्यावर।जीवघेणा हल्ला केला. त्यात हे दोघे गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरु असताना सार्थक पंडित याचा मृत्यु झाला होता.

आकाश थोरात टोळीतील टोळी प्रमुख व टोळीतील इतर साथीदारांवर २०१५ पासून १० गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. आकाश थोरातने त्याच्या टोळीचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी वेगवेगळ्या गुन्हेगार साथीदारांची मदत घेतली. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केल्या तरी त्यांच्या बेकायदेशीर कारवाया वाढत होत्या. त्यापार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्यामार्फत टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांच्याकडे पाठविला.

प्रस्तावाची छाननी करुन टोळीवर मोक्का कारवाईचा आदेश राजेश बनसोडे यांनी दिला आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त अतुल नवगिरे, राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमुले, सहायक पोलीस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे, पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे, सहायक।पोलीस फौजदार चंद्रकांत माने, पोलीस हवालदार ढमढेरे, पोलीस अंमलदार अजय सावंत, आबासाहेब खाडे यांनी केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top