पहलगाम हल्ल्यानंतर पुणे पोलिसांकडून दक्षता
marathinews24.com
पुणे – जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर देशभरात सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. परराष्ट्र मंत्रालयामार्फत देशात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार पुणे शहरात सध्या १०० हुन अधिक पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती उघडकीस आली आहे. त्यामध्ये लॉंग टर्ममध्ये ३५ पुरुष आणि ६५ महिला आहेत. तसेच टुरिस्ट व्हिसावर आलेल्या पाकिस्तान नागरिकांचा समावेश आहे.
राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची यशदाला भेट – सविस्तर बातमी
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क या परिसरांमध्ये हे नागरिक वास्तव्यास आहेत. स्थानिक पोलिसांकडून त्यांच्या ओळखी व कागदपत्रांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई परराष्ट्र मंत्रालयाच्या निर्देशानुसार केली जात असून, सध्या प्राथमिक माहिती संकलन आणि व्हिसाची वैधता तपासली जात आहे. पुणे पोलिसांनी सांगितले की, परराष्ट्र मंत्रालयाकडून आदेश आल्यानंतरच प्रत्यक्ष कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.
पोलिस गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने या नागरिकांवर बारीक लक्ष ठेवत आहेत. त्यांच्या हालचाली, संपर्क, आणि सामाजिक व्यवहारांचीही चौकशी करण्यात येत आहे. पोलिस आणि प्रशासन सतर्क आहे. ही कारवाई केवळ देशाच्या अंतर्गत सुरक्षेला प्राधान्य देत केली जात आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या पुढील मार्गदर्शक तत्त्वांनुसारच पुढील पावले उचलली जाणार आहे. – मिलिंद मोहिते, पोलीस उपायुक्त, विशेष शाखा, पुणे पोलीस