संबंधित महिलेविरूद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – ससून रूग्णालयाता मुलाला जन्म दिल्यानंतर आई पसार झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी संबंधित महिलेविरूद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १९ मार्च २०२५ ला घडली असून, २२ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपा (वय १८ रा. चिंचवड) असे गुन्हा दाखल केलेल्या महिलेचे नाव आहे. आम्रपाली आलटे (वय ३९ रा. मोरवाडी, पिंपरी) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
बनावट चावीने फ्लॅट उघडून केली चोरी – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्रपाली आलटे समाजसेविका असून, बेवारस नवजात मुलांसाठी काम करतात. आरोपी महिला दीपाने १७ मार्चला ससून रूग्णालयात मुलाला जन्म दिला होता. त्यानंतर दोन दिवसांनी संबंधित महिलेने कोणालाही न सांगता मुलाचा परित्याग करीत ससून रूग्णालयातून पलायन केले. तिने मुलाच्या संगोपनाची जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गर्कळ तपास करीत आहेत.