Breking News
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केडगाव व लोणंदसह राज्यातील १५ अमृत स्थानकांचे गुरुवारी उद्घाटनकुख्यात गजानन मारणेचा जामीन अर्ज फेटाळलातळजाई टेकडीवर तरुणाला शस्त्राचा धाक दाखवून लुटलेपुरस्कार मिळणं हा रोमांचित करणारा क्षण – अभिनेते गिरीश कुलकर्णीडिएपी खताऐवजी पर्यायी खते वापरण्याचे आवाहनज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कारसराफाला जीवे मारण्याची धमकी, पोलीस हवालदार निलंबितपुण्यात २४ तासात ५४ झाडे कोसळलीअपघाताचा रचला बनाव, खोट्या माहितीच्या आधारे लाटला विमाबसप्रवासात जेष्ठ महिलेचे सोन्याचे कडे चोरीला

आई मरीमाता मंदीरात बसलोय…बिगबॉस विजेता सूरजचे अश्रू थांबेनात

चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर सूरज चव्हाणने गाठले गाव; व्हिडीओ कॉलिंगद्वारे साधतोय मित्रांसोबत संवाद

marathinews24.com

पुणे – माझं काय चुकल एवढं सांगा, पिक्चर बघा ना, मग काय बोलायचे बोला, माझी काहीच चुकी नाही झाली, तरी कसं काय बोलू शकतात. पिक्चर बघितला नाही तरी मला नावं ठेवत्यात, अशी खंत रिलस्टार आणि बिगबॉस विजेता सूरज चव्हाण याने व्यक्त केली आहे. पॅडी उर्फ पंढरीनाथ कांबळे यांच्यासोबत व्हिडिओ कॉलद्वारे संभाषण करीत असताना सूरज भावूक झाल्याचे दिसून आले आहे. झापूक-झुपूक चित्रपटाला म्हणावा असा प्रतिसाद न मिळाल्यामुळे तो अतिशय दुःखी झाल्याचे दिसून आले आहे.

पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्ती, विवेक फणसाळकर आज होणार निवृत्त – सविस्तर बातमी 

बिगबॉसवेळी लाखो प्रेक्षकांमुळेच मी मोठा झाले आहे. मी कधी त्यांना म्हणत नाही, मला तुम्ही अस बोलता, तस का बोलता, मी कधीच त्यांना नावं ठेवत नाही. कारण मी त्यांना माझं मानतो, प्रेक्षक माझा जीव हाय, असे म्हणत त्याने पॅडीला आपली खदखद बोलून दाखविली आहे. माझा चित्रपट लोकांनी बघितला पाहिजे. झापूक-झुपूकच्या माध्यमातून मी माझी कला दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, लोकांनी चित्रपट बघण्याआधीच मला ट्रोल केल्याचे सांगत त्याच्या डोळ्यातून अश्रूही आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बिगबॉस विजेता सूरज चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आला असून, तो त्याच्या गावातील आई-मरीमाता मंदीरात बसल्यामुळे चाहत्यांच्या काळजात चर्रर्र झाले आहे.

तू लढ भावा, आम्ही सोबत आहोत- पॅडी उर्फ पंढरीनाथ कांबळे

कोणत्याही क्षेत्रात संर्घषातून आपल्याला पुढे जावे लागते. मला माझे करिअर करताना लोकांनी खूप नावे ठेवली होती. आरं हा काय अ‍ॅक्टर आहे का, बघ केवढसा आहे असे बोलून माझ्या शरीरयष्टीवरही चर्चा झाली. मात्र, आपण नेहमी सातत्याने पुढे जाउन टीकाकारांना उत्तर द्यायचे असते, असा सल्ला अभिनेता पॅडी उर्फ पंढरीनाथ कांबळे यांनी सूरज चव्हाण याला दिला आहे. तू घाबरू नकोस, हेच लोक तुला आणखी डोक्यावर घेउन नाचतील असे काम तू कर, असा सल्लाही त्यांनी सूरजला दिला आहे. दिग्दर्शक केदार जाधव सरांनी तुझ्यातील कला ओळखून मोठ्या स्क्रीनवर आणले आहे. आता तुला पुढे जायचे असून, सुरवातीला आलेले दुःख नंतर आनंद देतो, तू लढ भावा असे म्हणत पॅडीने सूरजचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला.

सूरजने १२ लाख फॉलोअर, मात्र, चित्रपटाला प्रतिसाद नाही

बिग बॉसमुळे प्रकाश झोतात आलेला सूरज चव्हाण याचे सोशल मीडियावर तब्बल १२ लाख फॉलोअर असून, त्यांच्या पाठिंब्यामुळेच तो बिग बॉसचा विजेता ठरला होता. गोलीगत धोका, बुक्कीत डेंगूळ, टाय-टाय फिस, करिअर महत्वाच हाय, लग्न नंतर कधीही होतय अशा डायलॉगमुळे सूरज महाराष्ट्रातील घराघरात पोहोचला आहे. मात्र, नुकताच त्याचा प्रदर्शित झालेला झापुक-झुपूक चित्रपटाला प्रेक्षकांनी पाठ दाखविली आहे. त्यामुळे नाराज झालेला सूजर आपल्या बारामतीतील मूळगावी गेला आहे. ज्याठिकणाहून त्याने सुरूवात केली, त्याच आई मरीमातेच्या मंदीरात बसून त्याने अश्रू गाळले आहेत. त्यामुळे दुखावलेला सूरज पुन्हा सोशल मीडियात येउन आपली कला दाखवेल का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले घर बांधून

कलेच्या जोरावर महाराष्ट्रातील घराघरात पोहचलेला अभिनेता सूरज चव्हाण बिगबॉसचा विजेता ठरला होता. मात्र, एवढे असूनही त्याला राहायला चांगले घर नसल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी तातडीने दिवाळीत सुरजला घर बांधून देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आता सूरजच्या घराचे बांधकाम सुरू असून, बांधकामाची पाहणी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top