Breking News
घरफोडी करणाऱ्या सराईतांना अटक; ८ गुन्हे उघडकीसकुष्ठरोग निर्मूलन समन्वय बैठक संपन्नबालदिनानिमित्त दोन दिवशीय बालकुमार साहित्य संमेलनाचे रोजी आयोजननिवडणूक खर्चाच्याअनुषंगाने दर निश्चितीबाबत बैठक संपन्नजिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती कामकाजाबाबत बैठक संपन्ननगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका शांतेत, निर्भय आणि न्याय वातावरणात पाडण्याच्यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारीनगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारीएटीएस’कडून कोंढवा भागातील संशयितांची झाडाझडतीवारजे, खडकीत अपघातात दोघे ठारनाट्य निर्माते, नाट्य व्यवस्थापकांचा ‌‘रंगयात्री‌’ ॲपला विरोध

‘स्वरयज्ञ’ महोत्सवातून रसिकांना सांगीतिक भेट

‘स्वरयज्ञ’ महोत्सवातून रसिकांना सांगीतिक भेट

होत्सवाचे यंदाचे चौथे वर्ष

marathinews24.com

पुणे – स्वरयज्ञ संगीत महोत्सवात सुप्रसिद्ध गायक-वादकांचे बहारदार सादरीकरण झाले. या अनोख्या सादरीकरणातून रसिकांना एक वेगळी सांगीतिक भेट मिळाली. महोत्सव येरवडा येथील एस. एन. बी. पी. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सरस्वती सभागृहात आयोजित करण्यात आला होता. महोत्सवाचे यंदाचे चौथे वर्ष आहे.

तब्बल १ हजार १११ शंख वादकांनी वादन करत केला विश्वविक्रम – सविस्तर बातमी 

महोत्सवाच्या सुरुवातीस प्रास्ताविकात एस. एन. बी. पी. संस्थेच्या अध्यक्ष डॉ. वृषली भोसले म्हणाल्या, पूर्व पुणे परिसरातील रसिकांना सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेता यावा तसेच भारतीय शास्त्रीय कला व संस्कृतीच्या वारशाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने स्वरयज्ञ महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमासह विद्यार्थ्यांमधील कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, या करिता शाळेतील विद्यार्थ्यांनाही या महोत्सवात सहभागी करून घेण्यात येते.

मैफलीची सुरुवात जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका विदुषी सानिया पाटणकर यांच्या गायनाने झाली. त्यांनी सुरुवातीस राग गौड मल्हार रागातील विलंबित तीन तालातील ‘मानन करिए तुमरे कारन’ ही बंदिश सादर केली. त्यानंतर द्रुत तीन तालातील ‘बैरि भयो सजनिया’ ही बंदिशी अतिशय सुरेलपणे ऐकविली. सानिया पाटणकर यांनी आपल्या गायन मैफलीची सांगता द्रुत आडाचौताल मधील ‘उमड घन गगन आयो रे’ या पारंपरिक बंदिशीने केली. उत्तम फिरत असलेला सुमधुर आवाज, बहारदार ताना, सुश्राव्य गायनाने त्यांनी मैफलीत रंग भरले. विनायक गुरव (तबला), माधव लिमये (संवादिनी), वेदवती परांजपे (सहगायन), नितीन महाबळेश्र्वरकर (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

सत्याजित तळवलकर यांचे एकल तबला वादन झाले. त्यांनी तबल्यावर जोरकस वादन करून तीन ताल सादर केला व रसिकांची वाहवा मिळविली. त्यांच्या वादनातील दाया बायाचे उत्तम संतुलन, आकर्षक लय आणि वादनातील चपळता पाहून रसिक मंत्रमुग्ध झाले. अभिषेक शिनकर (लेहरा) यांनी समर्पक साथ केली.

शेवटच्या सत्रात मेवाती घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका मधुश्री नारायण यांचे सुश्राव्य, सुमधुर गायन रंगले. त्यांनी आपल्या गायन मैफलीची सुरुवात मेवाती घराण्यातील प्रसिद्ध राग नट नारायणमधील विलंबित एकतालातील ‘जब से छब देखी’ या बंदिशीने केली. त्यानंतर झपतालात ‘निरंकारा’ ही रचना सादर केली. मैफलीची सांगता ‘माता रानी भवानी जगत्‌ जननी माँ’ या रचनेने केली. विनायक गुरव (तबला), संतोष घंटे (संवादिनी) यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस एस. एन. बी. पी. शाळेतील विद्यार्थ्यांनी सामूहिक गायन-वादनाचे बहारदार सादरीकरण केले. कलाकारांचा सत्कार डॉ. वृषली भोसले, प्राचार्य रश्मी शुक्ला यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×