खाऊच्या आमिषाने अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे

खाऊच्या आमिषाने अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे

वारजे पोलिसांकडून तरुणाविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – खाऊच्या आमिषाने अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या एकाविरुद्ध वारजे माळवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रकाश धोंडिराम घोरपडे (वय ३८, रा. वारजे माळवाडी) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मेट्रो प्रवासी महिलेशी अश्लिल वर्तन, ज्येष्ठाविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी घाेरपडेने अल्पवयीन मुलीला खाऊ देण्याच्या आमिषाने अश्लील कृत्य केले. मुलीने घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) घोरपडेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक लुगडे तपास करत आहेत.

लग्नाच्या आमिषाने बलात्कार

लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार केल्या प्रकरणी एकाविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आदित्य दीपक केदारी (वय २३, रा. पिरंगुट) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पीडित तरुणीने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची आरोपी केदारी याच्याशी सहा महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. केदारीने तिला विवाहाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. तिच्यावर त्याने बलात्कार केला. तरुणी गर्भवती राहिली. तिने विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने विवाह करण्यास नकार दिला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×