केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
बीड (अनंत जाधव) – प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाला मारहाण केल्याची घटना जिल्ह्यातील केज मधील सांगवी सारणी येथे घडली आहे. ग्रामसभा सुरू होण्यापूर्वीच नोंद रजिस्टर फाडून फेकून दिल्यामुळे गावातील नागरिकांमध्ये संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे.अमोल पंढरीनाथ मुसळे (वय ३७) असे मारहाण झालेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. ते सारणी,सांगवी येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत.
पुण्यातील बुधवार पेठेत ९ महिलांसह दहा बांगलादेशीना पकडले – सविस्तर बातमी
मुसळे यांनी केज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २६ जानेवारीला ध्वजारोहण झाल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात ते ग्रामसभेची तयारी करत होते. त्यावेळी आरोपी प्रविण सर्जेराव केदार याने तिथे येऊन “सरपंच, उपसरपंच मिळून तुम्ही गावचा पैसा खाता, काम करत नाहीत” असे म्हणत शिवीगाळ केली. आरोपीने मुसळे यांच्या कानाखाली मारून त्यांना गचांडी धरून कार्यालयाबाहेर काढले. शासकीय कामकाजाचे प्रोसिडिंग रजिस्टर फाडून फेकून दिले. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १३२, ११५ (२) आणि ३५२ नुसार केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा तपास महिला पोलीस अंमलदार हानवते करत आहेत.
























