Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने ५० लाखांची ऑनलाइन फसवणूक

शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने ५० लाखांची ऑनलाइन फसवणूक

मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक

marathinews24.com

पुणे – शेअर ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत आयटी व्यावसायिकाची तब्बल ४९ लाख ८५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार लोहगाव परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अमोल सुरेश चौधरी (वय ३५) यांनी तक्रार दिली असून, युट्युब लिंकद्वारे संपर्क साधणारे अज्ञात व्यक्ती तसेच शितल मोगल जगदाळे, हिमांश शर्मा आणि मंगल मोगल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ३१ मार्च २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घडला आहे.

केटरिंग कॉन्ट्रॅक्टच्या नावाखाली ११ लाखांची फसवणूक – सविस्त बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी तक्रारदाराला शेअर ट्रेडिंग स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे सांगून विश्वासात घेतले. त्यानुसार तक्रारदाराकडून वेळोवेळी विविध बँक खात्यांमध्ये ६३ लाख रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतले. या गुंतवणुकीच्या बदल्यात आरोपींनी केवळ १३ लाख १५ हजार रुपये परत केले. मात्र, उर्वरित रक्कम परत न करता टाळाटाळ करत अखेरीस फसवणूक केल्याचे उघड झाले. पुढील तपास लोहगाव पोलिस करत आहेत.

फॉरेक्स ट्रेडिंगच्या आमिषाने ज्येष्ठाची १ कोटींची फसवणूक

फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी कोंढवा परिसरातील ज्येष्ठ नागरिकाची १ कोटी १ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह आयटी ऍक्टनुसार संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ज्येष्ठ नागरिकांना आरोपींनी फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. त्यानुसार विश्वास संपादन करून त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले. दरम्यान, १९ ऑक्टोबर २०२५ ते २६ फेब्रुवारी २०२६ कालावधीत तक्रारदाराकडून वेळोवेळी १ कोटी १ लाख ६१ हजार ८४५ रुपये विविध खात्यांमध्ये ट्रान्सफर करून घेण्यात आले. मात्र, कोणताही परतावा न देता आरोपींनी फसवणूक केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×