विद्यार्थ्यांना दिला मदतीचा हात; स्नेह मेळावा उत्साहात
marathinews24.com
बारामती – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आपली बारामती आपली माणसं या ग्रुपच्यावतीने यंदाही अनोख्या पद्धतीने स्नेहमेळावा पार पडला. दीपावलीच्या निमित्ताने ग्रुपच्यावतीने विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यात आला. उपस्थित अधिकाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने देणगी गोळा केली. स्नेह मेळाव्याचे यंदाचे सातवे वर्ष असून, मंगळवारी (दि. २१) कार्यक्रम पार पडला. सामाजिक बांधिलकी पार पाडण्यासाठी यापुढेही अशीच मदत केली जाणार असल्याचा संकल्प ग्रुपच्यावतीने करण्यात आला आहे. ११० सदस्य एकत्र येऊन स्नेह संबंध जपला आहे.

ओला दुष्काळ असलेल्या भागातील शेतकऱ्यांना बळ दे – आमदार हेमंत रासने – सविस्तर बातमी
विद्यार्थ्यांसाठी अमोल दिवेकर मदतीचा हात दिला. त्यांनी बालभवनसाठी १०० विद्यार्थ्यांना शालेय किट वाटप केले. तर बारामतीमधील युवा उद्योजक संकेत चौधर यांनी २५ हजारांची देणगी दिली. डॉ. अतुल गरगडे यांनी ५० शालेय बॅग देणार असल्याचे सांगितले. ग्रुपमधील सर्व सदस्यांनी प्रत्येकी ५ हजार रुपये वार्षिक निधी जमा करण्याचा निर्णय घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनील रुपनवर यांनी केले.
स्नेह मेळाव्यामुळे “आपली बारामती आपली माणसं” या उपक्रमातील एकता, सामाजिक बांधिलकी आणि समाजोपयोगी कार्याची भावना अधिक दृढ झाली असल्याची भावना उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. स्नेह मेळाव्याचे नियोजन उपविभागीय वनअधिकारी हनुमंत जाधव, नायब तहसीलदार तुषार बोरकर, सहायक आयुक्त (विक्रीकर विभाग, अहिल्यानगर) भक्ती काळे, तालुका कृषी अधिकारी दिपक गरगडे यांनी केले होते. दरम्यान, नविन व जुन्या सदस्यांची ओळख, ‘बालभवन बारामती’ प्रोजेक्ट अहवाल सादरीकरण, विद्यार्थ्यांचे मनोगत, स्वयं सेवकांचा गौरव आणि नविन अधिकाऱ्यांचा सत्काराने सोहळा पार पडला.





















