Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

पुणे जिल्हयामध्ये पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न

पुणे जिल्हयामध्ये पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न

87 उमेदवारांची प्राथमिक तर 7 उमेदवारांची अंतिम निवड

marathinews24.com

पुणे – पुणे जिल्हयामध्ये पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,पुणे मार्फत नुकताच पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा, प्लेसमेंट ड्राईव्ह व करिअर समुपदेशन कार्यक्रम संपन्न झाला. या मेळाव्यास पुणे जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील एकूण 26 उद्योजकांनी त्यांच्याकडील विविध प्रकारची एकूण 1408 रिक्तपदांसह सहभाग नोंदवला. या मेळाव्यामध्ये एकूण 152 बेरोजगार युवक-युवतींनी सहभाग नोंदविला. उपस्थित उद्योजकांमार्फत रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उमेदवारांच्या मुलाखती प्रक्रियेद्वारे एकूण 87 उमेदवारांची प्राथमिक व 7उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली. या मेळाव्यास आमदार सिद्धार्थ शिरोळे, यांनी उद्योजक तसेच उमेदवारांशी संवाद साधला.

भिमाशंकर येथे येणाऱ्या भाविकांना सर्व आवश्यक सोयी सुविधा पुरवाव्यात – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

रोजगार मेळाव्याचे प्रमुख पाहुणे म्हणून कृष्णकुमार गोयल, अध्यक्ष,खडकी शिक्षण संस्था, पुणे हे उपस्थित होते. त्यांनी या मेळाव्याचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तसेच अनिल मेहता, उपाध्यक्ष, खडकी शिक्षण संस्था, आनंद छाजेड, चिटणीस, खडकी शिक्षण संस्था, संजय चाकणे, प्राचार्य, टीकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अनुपमा पवार, उपायुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता,विभागीय आयुक्तालय, पुणे व सा.बा.मोहिते, प्र.सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, पुणे हे या प्रसंगी उपस्थित होते.

याशिवाय प्रधानमंत्री कौशल्य केंद्र-शिरुर, आळेफाटा,ता.जुन्नर, जि.पुणे येथे आयोजित प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये परिसरातील 5 उद्योजकांनी व 75 उमेदवारांनी तर अमेझ इंजिनिअर्स सोल्युशन, नाणेकरवाडी ता.खेड, जि.पुणे येथील प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये 4 उद्योजकांनी व 25 उमेदवारांनी सहभाग नोंदविला.

जिल्हयातील नोकरीइच्छुक उमेदवारांना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने नवसह्याद्री एज्युकेशन सोसायटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स पॉलीटेक्निक,नायगाव (नसरापूर), ता.भोर, जि.पुणे येथे सुमारे 176 उमेदवारांच्या उपस्थितीत व शारदाबाई पवार इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग,शारदानगर, ता.बारामती येथे सुमारे 100 उमेदवारांच्या उपस्थितीत करिअर समुपदेशन सत्रे संपन्न झाली. त्याद्वारे उमेदवारांना त्यांच्या करिअरची दिशा निश्चित करण्याबाबत तज्ञांचे मार्गदर्शन लाभले.

जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीची बैठक संपन्न

अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत पुणे जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीची बैठक अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत आढावा घेण्यात आला.

कागदपत्रांअभावी अर्थसहाय्य प्रलंबित असलेल्या प्रकरणांत संबंधित विभागांनी तात्काळ कार्यवाही करुन सदर कागदपत्रे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयास उपलब्ध करुन द्यावेत. ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल होताच पोलीस विभागाने त्याबाबत तातडीने सहायक आयुक्त, समाज कल्याण पुणे व नागरी हक्क संरक्षण शाखा यांना अहवाल सादर करावा आणि पिडीत व्यक्तींचे जातीचे दाखले प्राप्त करून घेण्यासाठी पोलीस विभागाने संबंधित पिडीत व्यक्तींकडे पाठपुरावा करावा. पीडितांना न्याय देण्याकरिता सकारात्मक प्रयत्न करुन न्याय मिळवून द्यावा, अशा सूचना समिती द्वारे देण्यात आल्या.

सदरचा आढावा अध्यक्षांच्या परवानगी ने सदस्य सचिव सहायक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे यांनी घेतला. बैठकीसाठी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक, पुणे ग्रामीणचे पोलिस उप अधीक्षक दिलीप शिंदे,पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे सहायक आयुक्त विशाल हिरे यांच्यासह समितीचे अशासकीय सदस्य संतोष कांबळे, संतोष शेलार, हनुमंत पाटोळे उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×