Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

गणेश विसर्जन मिरवणुकीत घेतला सहभाग

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कसबा गणपतीला अर्पण केला पुष्पहार

marathinews24.com

पुणे – विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यंदाच्या पारंपरिक गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला होता. पुण्याच्या पहिल्या मानाच्या श्री कसबा गणपतीला त्यांनी पुष्पहार अर्पण करून प्रसाद अर्पण केला तसेच दुसऱ्या मानाच्या श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीचे दर्शन घेऊन प्रसाद अर्पण केला. मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी भावनिक बाब आहे. कसबा गणपती व तांबडी जोगेश्वरीच्या कृपेने पुणेकरांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती नांदो, अशी माझी प्रार्थना आहे, भावना त्यांनी व्यक्त केली.

एमआयटी एडीटी’ विद्यापीठाच्या बाप्पाला निरोप – सविस्तर बातमी

गणेशोत्सव हा उत्सव केवळ भक्तिभावाचा नाही, तर सामाजिक ऐक्य, परंपरेची जपणूक आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोन देणारा आहे. सर्व पुणेकरांनी सुरक्षिततेचे भान ठेवून, भक्तिभावाने आणि आनंदाने उत्सवाचा समारोप करावा.”

यावेळी पुणे उपविभागीय अधिकारी विठ्ठल जोशी यांनी विशेष विनंती करून डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते कसबा गणपतीला प्रशासनाच्यावतीने हार अर्पण करण्यात आला.
सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह महापालिका, युवासेना सचिव किरण साळी, शिवसेना उपशहर प्रमुख नितीन पवार तसेच पोलीस आणि महसूल प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मानाच्या कसबा गणपती मंडळाच्यावतीने व तांबडी जोगेश्वरी मंदिर गणेश मंडळाच्या वतीने डॉ. नीलम गोऱ्हे यांचा श्रीफळ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या सामाजिक कार्याचा आणि महिलांसाठी त्यांनी केलेल्या उपक्रमांचा विशेष गौरव केला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×