Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

टेम्पोच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू

नगर रस्त्यावरील लोणीकंद भागातील घटना

marathinews24.com

पुणे – भरधाव टेम्पोच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावरील लोणीकंद भागात घडली. याप्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याची ओळख पटलेली नाही. मृत्यूमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे वय अंदाजे ५० वर्ष आहे. याबाबत पोलीस हवालदार विनोद भोसले यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कोंढवा, चंदननगर भागात घरफोडी – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव टेम्पो गुरुवारी (२ ऑक्टोबर) दुपारी दीडच्या सुमारास नगर रस्त्याने निघाला होता. लोणीकंद पोलीस ठाण्यासमोर भरधाव टेम्पोने पादचाऱ्याला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी टेम्पो चालक आनंदा विनोद पवार (वय २१, रा. लोणीकंद, नगर रस्ता) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक वंजारी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×