पुण्यात पॅलिस्टीनच्या समर्थनार्थ पोस्टर वाटप

पुण्यात पॅलिस्टीनच्या समर्थनार्थ पोस्टर वाटप

तरूणांना मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

marathinews24.com

पुणे– हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात एका मुलीने सोशल मीडियावर पाकड्यांच्या समर्थनार्थ जिंदाबादचे नारे काही दिवसांपुर्वी व्हायरल केले होते. त्यानंतर आता चक्क पॅलिस्टीनच्या समर्थनार्थ काही तरूणांनी पोस्टर वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार कर्वेनगरमध्ये घडला आहे. मात्र, पोस्टर वाटप करताना संबंधित तरुणांना राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांनी चोप दिला आहे. दरम्यान वारजे पोलीस ठाण्यात दोन्ही गट तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र रविवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नाही.

हॉटेल चालक नव्हे अमली पदार्थ तस्कर – सविस्तर बातमी 

मिळालेल्या माहितीनुसार, कर्वेनगर भागात काही तरुण पॅलिस्टीन समर्थनार्थ पोस्टर वाटप करत असल्याची माहिती भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांना मिळाली होती. हे पोस्टर्स तेथील मल्टी नॅशनल पिझ्झा कंपनीच्या समोर वितरित करीत होते. त्यावेळी राजकीय पक्षाचे कायकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत तरूणांना जाब विचारला. त्यांच्यात आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर परिसरात जमलेल्या स्थानिक नागरिकांनीही तरुणांना चोप दिला. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नागरिकांनी तरुणांवरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

तरूणीला पाकिस्तानचे प्रेम भोवले, शिक्षणसंस्थेने काढून टाकले

जम्मू-काश्मीरमधील पहेलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकड्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, पाकड्यांच्या समर्थनार्थ चक्क तरुणीने इन्स्टाग्रामवर पाकिस्तान जिंदाबादची पोस्ट केली होती. याप्रकरणी संबंधित तरुणी खतीजा शहाबुद्दीन शेख (वय १९ ) हिच्याविरुद्ध बीएनएस १५२, १९६, १९७, २९९, ३५२, ३५३ कलामानुसार गुन्हा दाखल करीत, तिला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.दरम्यान, सकल हिंदू समाजाने हा प्रकार समोर आणला होता. कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, तिला शिक्षण घेत असलेल्या संस्थेतून काढून टाकले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top