कर्वेनगरमधील घटना
marathinews24.com
पुणे – पोलीस असल्याची बतावणी करीत एकाने जेष्ठ महिलेला फोन करून त्यांच्या आधारकार्डचा गैरवापर झाल्याची खोटी माहिती दिली. नाशिकमध्ये आधारकार्डद्वारे अकाउंट काढून त्याचा वापर मनी लॉड्रींगसाठी केल्याची बतावणी केली. त्यानंतर बँक खात्याची चौकशी करण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडील तब्बल २१ लाख ६५ हजार रूपये आरोपीने स्वतःच्या बँक खात्यात जमा करण्यास सांगून फसवणूक केली आहे. ही घटना ८ फेबु्रवारी ते १ मार्च कालावधीत सीटी क्राउन बिल्डींग कर्वेनगरमध्ये घडली आहे.
सीबीआय ऑफिसर बोलत असल्याची केली बतावणी – सविस्तर बातमी
नमिता लळीगकर (वय ७६ रा. कर्वेनगर) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. संजय पिसे नावाच्या आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ महिला लळीगकर कर्वेनगरमध्ये राहायला असून, ८ फेबु्रवारीला त्यांना संजय पिसे नावाच्या व्यक्तीने फोन केला. स्वतः पोलीस असल्याची बतावणी करीत त्याने महिलेला आधारकार्डचा गैरवापर झाल्याची खोटी माहिती दिली. तुमच्या आधारकार्डचा वापर करून एकाने नाशिकमध्ये अकाउंट उघडले आहे. त्या अकाउंटचा वापर मनी लॉड्रींगसाठी झाला आहे. त्यामुळे आम्हाला तुमचे बँक खाते तपासावे लागणार असल्याचे आरोपीने महिलेला सांगितले. त्यानंतर त्याने महिलेला विविध बँक खात्यात तब्बल २१ लाख ६५ हजार रूपये भरण्यास सांगून फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक माने तपास करीत आहेत.